AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरच्या वाळलेल्या भाकरीची चव आता सातासमुद्रापार

सोलापूर : महिलांनी मनात आणलं तर त्या काय करू शकतात याच उत्कृष्ट उदाहरण सोलापुरात पाहायला मिळालं. सोलापुरातील लक्ष्मी नावाच्या महिलेने भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. लक्ष्मी यांचा सोलापुरात वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय आहे. बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी हा व्यवसाय करतात. लक्ष्मी यांनी दोन महिलांच्या साहाय्याने संतोषी माता महिला गृहउद्योग या नावाने हा व्यावसाय सुरु […]

सोलापूरच्या वाळलेल्या भाकरीची चव आता सातासमुद्रापार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

सोलापूर : महिलांनी मनात आणलं तर त्या काय करू शकतात याच उत्कृष्ट उदाहरण सोलापुरात पाहायला मिळालं. सोलापुरातील लक्ष्मी नावाच्या महिलेने भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. लक्ष्मी यांचा सोलापुरात वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय आहे. बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी हा व्यवसाय करतात.

लक्ष्मी यांनी दोन महिलांच्या साहाय्याने संतोषी माता महिला गृहउद्योग या नावाने हा व्यावसाय सुरु केला. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राची आणि आत्मा या शासकीय संस्थांची त्यांना आर्थिक मदत मिळाली. लक्ष्मी यांची ही वाळलेली भाकरी सोलापुरातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध झाली आहे.

आजतागायत आपल्याकडील शेतकरी केवळ माल उत्पादित करत आला आहे, मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र त्याने अवगत  केले नसल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत आला आहे. मात्र लक्ष्मी यांच्या भाकरी व्यवसायाने हा समज खोटा ठरवला आहे. एक किलो ज्वारी विकल्यास साधारणपणे 16 ते 18 रुपये मिळतात. जर त्याच एक किलो ज्वारीवर प्रक्रिया केली, तर त्यातून प्रक्रिया खर्च वगळता किमान दीडशे रुपये प्रतिकिलो नफा मिळू शकतो.

ज्वारी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र अलीकडच्या काळात ज्वारीबद्दल अनेक नकारात्मक गोष्टींची अफवा उठवली गेली. ती खोडून काढण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करत आहे. ज्वारीपासून अनेक पदार्थ बनवता येणे शक्य आहे. लक्ष्मी  यांनी ज्वारीपासून भाकरीच नाही तर केक, बिस्किट, रवा अशा गोष्टी बनविल्या असून त्याला बाजारातही चांगली मागणी आहे.

लक्ष्मी यांच्या हा संतोषी माता गृहउद्योग आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. मोठमोठ्या हॉटेलसह सर्वसामान्य खवय्येदेखील लक्ष्मी यांच्याकडूनच भाकरी घेऊन जातात. लक्ष्मी यांच्या या उद्यमशीलतेमुळे त्यांच्यासोबतच आसपासच्या 10-20 महिलांनाही रोजगार मिळाला आहे. एरवी गप्पा मारत बसणाऱ्या महिलांच्या हाताला आता काम मिळाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नतीदेखील होते आहे.

ज्वारी ही सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील काही काळात त्याची जागा ऊसाने घेतल्याने ज्वारी मागे पडत आहे. परंतु लक्ष्मी बिराजदार यांच्यासह अनेक महिलांनी त्याला नवी ओळख आणि वलय निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...