एकीकडे लाखो बेरोजगार, दुसरीकडे शिक्षक नाही, सरकारची मेगा भरती कधी?

महाराष्ट्रात अत्यंत विचित्र स्थिती तयार झाली आहे. एकीकडे डीएड आणि बीएड करुन लाखो तरुण शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. ही फक्त नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती नाही, तर राज्यभरात सरकारी शाळांमधे हीच स्थिती आहे. मग विना शिक्षक शाळा कशा चालतात? हाच सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एकीकडे लाखो बेरोजगार, दुसरीकडे शिक्षक नाही, सरकारची मेगा भरती कधी?
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 6:50 PM

नागपूर : महाराष्ट्रात अत्यंत विचित्र स्थिती तयार झाली आहे. एकीकडे डीएड आणि बीएड करुन लाखो तरुण शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात तब्बल 140 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. ही फक्त नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती नाही, तर राज्यभरात सरकारी शाळांमधे हीच स्थिती आहे. मग विना शिक्षक शाळा कशा चालतात? हाच सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातील सरकारी शाळांचं वास्तव देखील भयान आहे. एकट्या नागपूर जिल्हा परिषदेत तब्बल 140 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनीही ही बाब मान्य केली आहे. निवृत्तीमुळे ही पदं रिक्त असल्याचं शिक्षणाधिकारी सांगतात. पण पुरेशा पर्यायी व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. ही परिस्थिती फक्त नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच आहे असं नाही. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं रिक्त आहेत.

एकीकडे शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, तर दुसरीकडे डीएड आणि बीएड झालेले लाखो बेरोजगार तरुण शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत. मेगाभरतीच्या घोषणेनं शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांची मेगाभरती देखील केवळ सरकारी घोषणाच ठरली. त्यामुळे एकीकडे लाखो डीएड-बीएड झालेले तरुण बेरोजगार आहेत, तर दुसरीकडे शिक्षकांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत. राज्यभरातही अशीच परिस्थिती आहे. एकीकडे रिक्त पदं आणि दुसरीकडे लाखो बेरोजगार अशी स्थिती तयार झाली आहे. त्यामुळेच सरकार शिक्षकांची मेगा भरती नेमकी कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.