AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीला गावी जाताय? मग एसटीनेच जा!, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून हंगामी दरवाढ रद्द

दिवाळी सुट्टीमध्ये दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात वाढ करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे दिवाळीला गावाकडे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळीला गावी जाताय? मग एसटीनेच जा!, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून हंगामी दरवाढ रद्द
| Updated on: Oct 29, 2020 | 1:22 PM
Share

मुंबई: दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीकडून केली जाणारी हंगामी दरवाढ यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात एसटीकडून दरवाढ केली जाते. मात्र, यावर्षी ही दरवाढ रद्द करत दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणाऱ्यांसाठी एसटीने मोठा दिलासा दिला आहे. (State government announce ST will not increase fares in Diwali)

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्त्रोत म्हणून एसटीकडून दरवाढ केली जाते. ही दरवाढ 30 टक्क्यांपर्यंत करण्याचा अधिकार एसटी महामंडळाला आहे. या अधिकारानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या काळात सर्व प्रकारच्या बससेवेसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करुन अतिरिक्त महसूल मिळवण्याचा एसटीचा प्रयत्न असतो. पण यावर्षी एसटी महामंडळानं ही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत एसटी महामंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाचं “प्रवाशी देवो भव:”

गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं अशा बिकट परिस्थितीत अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द केली आहे. या माध्यमातून एसटीने ‘प्रवाशी देवो भव:’ या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला

कोरोनाच्या संकटामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं दोन महिन्यांचं वेतन थकीत आहे.  त्यामुळे राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश करणार आहेत. प्रलंबित वेतनासाठी 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला; दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा

प्रवाशांना बोनस, दिवाळीत एसटीच्या तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या

State government announce ST will not increase fares in Diwali

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.