AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विरोधी अग्रलेख लिहायचा, मग भेट घालून द्यायची आणि नंतर स्वतः ट्विट करायचं ही नवी पद्धत : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामनात अभिनेता सोनू सूदवर केलेल्या टीकेला आणि त्यानंतरच्या घटनाक्रमावर सडकून टीका केली आहे (Sudhir Mungantiwar criticize Sanjay Raut).

आधी विरोधी अग्रलेख लिहायचा, मग भेट घालून द्यायची आणि नंतर स्वतः ट्विट करायचं ही नवी पद्धत : सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Jun 08, 2020 | 5:37 PM
Share

चंद्रपूर : भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामनात अभिनेता सोनू सूदवर केलेल्या टीकेला आणि त्यानंतरच्या घटनाक्रमावर सडकून टीका केली आहे (Sudhir Mungantiwar criticize Sanjay Raut). आधी सामना दैनिकात उत्तम सेवा कार्य करणाऱ्या सोनू सूद विरोधी अग्रलेख लिहायचा, मग त्यांना मातोश्रीवर भेटीसाठी घेऊन जायचं आणि नंतर स्वतः ट्विट करायचं अशा नवी कार्यपद्धत संजय राऊत यांनी विकसित केल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच याबाबतचा खुलासा त्यांनाच विचारायला हवा, असं ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “सोनू सूद यांच्या मातोश्री भेटीविषयी त्यांची रणनीती आणि नियोजन याबाबतचे उत्तर भेटीसाठी त्यांना घेऊन जाणारेच देतील. उत्तम काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यात राजकारण करणे योग्य नाही. देशाने नेहमीच सेवेची किंमत केली आहे. सेवेबद्दल शंका उपस्थित करु नका. हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही. संजय राऊत यांनी नवी पद्धत विकसित केली आहे. आधी विरोधी अग्रलेख लिहायचा, मग भेट घालून द्यायची आणि नंतर स्वतः ट्विट करायचे ही त्यांची पद्धत आहे. याबाबतची माहिती स्वतः संजय राऊतच देतील.”

बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सामनातून टीका झाली की सेलिब्रिटी बाळासाहेबांना येऊन भेटायचे. आताही त्याची पुनरावृत्ती होत आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही पद्धत आश्चर्यजनक असल्याचं मत व्यक्त केलं. मदत करणाऱ्यांच्या विरोधात लेख लिहिणे योग्य नाही. आता त्यांनीच यासंबंधी उत्तर द्यायला हवं, अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता संपूर्ण चीनच्या आकड्यांच्या पुढे गेली आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अपयश असा शब्द वापरुन कोरोना नियंत्रणाचे राजकारण करायला नको. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र एखाद्या पक्षाची मालकी नाही, तो जनतेचा आहे. विरोधी पक्षांशी संवाद साधत त्यांच्या सूचनांचा आदर करत अंमलबजावणी केल्यास हे शक्य होऊ शकेल. विरोधकांची सूचना म्हणजे केराची टोपलीच असे समजण्याचे कारण नाही. असे केल्यास लोकही मतपेटीतून सरकारला बाद करतील. सर्वांना समान संधी आहे. याची आठवण ठेवावी. तिन्ही पक्षांपेक्षा अधिक मतं या राज्यांत जनतेने भाजपला दिली आहेत. जनहिताशी संबंधित असलेले विषय आणि सूचना स्वीकारुन अंमलबजावणी झाली पाहिजे.”

महाराष्ट्रा मागचे कोरोनाचे संकट दूर व्हावे. कोरोना बाधित रुग्ण शून्यावर यावे, ही आपली भावना असली पाहिजे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगातील 13 व्या क्रमांकाचे व्यापारी शहर आहे. देशाची आर्थिक स्थिती मुंबई ठरवते. त्यामुळे या कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत काही कमतरता असल्यास त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. आरोग्यव्यवस्था सुधार-जनजागृती याबाबत काही मुद्दे असल्यास त्याबाबत सखोलतेने विचार आणि मंथन-अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हाताला काम नाही, खिशात पैसे नाही याबाबत अभ्यास करुन निर्णय घेतले जावे. यशस्वी ठरलेले भीलवाडा अथवा सिंगापूर पॅटर्न याबाबतचा अभ्यास व त्याची मुंबईत अंमलबजावणी गरजेची आहे. राज्यातील 36 हजार उद्योगांपैकी केवळ 9 हजार उद्योग सुरु झाले आहेत. हे लक्षण योग्य नाही. हा आर्थिक प्रगतीत स्पीड ब्रेकर असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा

सोनियांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान पुन्हा रिंगणात, 87 व्या वर्षी राज्यसभा उमेदवारी

ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी, तर आधी हातातील मोबाईल, घरातील सामान जाळा, संभाजी ब्रिगेडचा खोचक सल्ला

Sudhir Mungantiwar criticize Sanjay Raut

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.