अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने नुकतंच एक वेडींग फोटोशूट केलं आहे. यात ती फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
विविध वेडिंग गाऊनमध्ये अथियाने हे फोटो शूट केलं आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
एका वेडिंग मॅगझिनसाठी अथियाने हे ग्लॅमरस फोटो काढले आहेत. यातील एका फोटोत तिने राखाडी रंगाचा भरजरी गाऊन परिधान केला आहे.
हा स्लिवलेस गाऊन असून त्याच्या एका बाजूला बाजूबंदाप्रमाणे आकर्षक डिझाईन केली आहे.
तर दुसऱ्या एका फोटोत तिने लाल आणि पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला मल्टिकलर लेहंगा घातला आहे. यावर तिने मॅचिंग सोनेरी रंगाचे इगरिंग्सही घातले आहे.
अथियाने परिधान केलेल्या सर्व लेहंग्यात ती नववधूप्रमाणे दिसत आहे.
तर काही गाऊनवर तिने फार कमी मेकअप केला आहे. तरीही ती फार सुंदर दिसत आहे.
या मॅग्झिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये तिने गुलाबी रंगाची सिल्कची साडीही घातली आहे. या साडीत ती अगदी ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
तिने या फोटोशूटचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर लोकेश राहुलच्या अफेअर असल्याच्या चर्चा रंगत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतंही खात्रीलायक वृत्त समोर आलेलं नाही.