पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आमनेसामने

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आमनेसामने
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 9:13 PM

बीड : ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन कामगारांनी ऊसतोडीसाठी निघण्याचे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र पंकजा यांच्या आवाहनानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी उघड-उघड पंकजांच्या विरोधात भूमिका घेतलीये. जोपर्यंत दीडशे टक्के भाववाढ होणार नाही तोपर्यंत एकही मजूर कामावर जाणार नाही आणि कुणी काही वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर पुढे काय होईल हे सांगता येणार नाही, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. (Suresh Dhas Slam Pankaja Munde over Sugarcane Worker)

जर 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कामगारांनी ऊसतोडीसाठी निघायला हरकत नाही, अशी भूमिका पंकजा यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचा सुरेश धस यांनी जोरदार समाचार घेतला. आम्हाला जोपर्यंत दरवाढ मिळत नाही तोपर्यंत 11 संघटनांचं आंदोलन सुरुच राहील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय.

सुरेश धस म्हणाले, ” गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, तसंच माझ्यासहित 11 संघटनांच्यावतीने, ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 150 टक्के वाढ करण्यात यावी, मुकादमांचं कमिशन साडे 18 टक्क्कांवरुन 37 टक्के करण्यात यावं तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ 50 टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. तसंच साखर करखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातल्या व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करुन द्यावी, अशीही मागणी असल्याचं धस यांनी सांगितलं.

“येत्या 27 तारखेला पुण्यातल्या मांजरीमध्ये साखरसंघ आणि आमच्या संघटनांची बैठक आहे. ही बैठक जोपर्यंत पार पडत नाही आणि त्यातून काही निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या कोणत्याही मुकादमाने आणि कामगाराने आपलं बिऱ्हाड बांधू नये. तसंच बाहेरच्या ठेकेदारांनी विनाकारण हिम्मत करु नये. जर का आमच्या उसतोडी संघटनांनी उग्र स्वरुप धारण केलं तर ते कोणत्या टोकाला पोहोचतील हे सांगता येणार नाही”, असा इशारा धस यांनी दिलाय.

“शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचं काही एक म्हणणं नाही पण आमच्याही उसतोड कामगारांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दरवाढ मिळेपर्यंत आमच्या संघटनांनी पुकारलेलं हे आंदोलन चालूच राहणार” असल्याचं सुरेश धस यांनी ठासून सांगितलं आहे.

सुरेश धस यांनी उघड-उघड पंकजा यांच्या आवाहानाच्या विरुद्ध भूमिका घेतलीये. तसंच ऊसतोड मजुरांनी अधिक न ताणता 21 रुपयांची दरवाढ मिळाली तर ऊसतोडणीसाठी निघावं, पंकजांच्या या मताशी आपण सहमत नसल्याचं धस यांनी सांगितलंय. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात फूट पडल्याचं चित्र आहे.

पंकजांनी केलेलं आवाहन कामगारांसाठी की साखर कारखानदारांसाठी?, वंचितचा सवाल

पंकजा मुंडे यांनी कामगारांना उद्देशून आंदोलन केलंय. पण हे आवाहन कामगारांसाठी आहे की साखर कारखानदारांसाठी?, असा सवाल करत वंचितच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे.

“पंकजा मुंडे यांच्याकडून या आवाहनाची अपेक्षा नव्हती. खरंतर त्या विरोधी पक्षाच्या सक्षम नेत्या आहेत. त्यांनी कामगारहिताची भूमिका घ्यायला हवी. कधी नव्हे तो ऊसतोड कामगार वंचितच्या छत्रछायेखाली एकत्र येत होता मात्र याला सुरुंग लावण्याचं काम काही सो कॉल्ड पुरोगामी आणि कारखानदारांची बाजू घेणाऱ्या काही नेत्यांनी केलं”, असा निशाणा दिशा शेख यांनी साधला.

(Suresh Dhas Slam Pankaja Munde over Sugarcane Worker)

संबंधित बातम्या

ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला नेतेच जास्त येऊ नये; पंकजा मुंडेंचा आंबेडकरांना टोला

दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा; अन्यथा आंदोलन अटळ : पंकजा मुंडे

ऊसतोड कामगार, मुकादम अन् वाहतूकदारांना जिल्ह्यांतच अडवा, प्रकाश आंबेडकरांचे वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.