AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bear Grylls : बेअर गिल्सवर प्रशांत महासागराजवळील बेटावर हल्ला, चेहरा आणि डोळे सुजले

जगभरातील घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणाऱ्या बेअर ग्रिल्स (Bear Grylls) याच्यावर मधमाश्यांनी (Honey bee attack) हल्ला केला आहे.

Bear Grylls : बेअर गिल्सवर प्रशांत महासागराजवळील बेटावर हल्ला, चेहरा आणि डोळे सुजले
| Updated on: Aug 31, 2019 | 11:11 AM
Share

Bear Grylls कोलंबिया : जगभरातील घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणाऱ्या बेअर ग्रिल्स (Bear Grylls) वर मधमाश्यांनी (Honey bee attack) हल्ला (bee stings) केला आहे. एका शो च्या शूटींगदरम्यान बेअर गिल्सवर (Survival Expert Bear Grylls) मधमाश्यांनी हल्ला केला असून यातून तो थोडक्यात बचावला आहे. मात्र मधमाश्यांच्या हल्लामुळे त्याच्या चेहऱ्यावर सूज आली आहे.

बेअर गिल्स हा प्रशांत महासागरजवळच्या (Pacific Ocean) एका बेटावर ‘ट्रेजर आयलँड’ (Treasure Island) या नव्या टेलिव्हिजन शोची शूटींग करत होता. या दरम्यान ते एका बोटीतून जात असताना अचानक त्याच्यावर मधमाश्यांनी हल्ला चढवला. सुरुवातीला बेअर ग्रिल्सला काहीही वाटले नाही म्हणून त्याने शूटींग सुरु ठेवले. मात्र बेअर ग्रिल्सला मधमाश्यांची एलर्जी असल्याने त्याची तब्येत जास्त बिघडली.

बिअर ग्रिल्सची तब्येत खालावल्याने त्याला तात्काळ वैद्यकीय पथकाकडून (medical team) एक इंजेक्शन देण्यात आलं. त्याशिवाय त्याला इतरही वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. मात्र यादरम्यान त्याच्या चेहरा संपूर्ण सुजला. पण त्यापूर्वीच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्रेजर आयलँड या शोचा हा भाग पुढच्या महिन्यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

या शो मध्ये भाग घेणाऱ्या ब्रेन सर्जन मनो शनमुगनाथन यांनी बेअर ग्रिल्सच्या बचावासाठी प्रयत्न सुरु केले. “बेअर ग्रिल्स हे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांना आयुष्यात काय साध्य करायचे आहे, ते त्यांना बरोबर माहित आहे,” असे मतही मनो शनमुगनाथन यांनी सांगितले. “बेअर ग्रिल्स यांच्यावर झालेला मधमाश्यांचा हल्ला आणि त्यांच्यावरील उपचार हा खूप थरारक अनुभव होता,” असेही त्यांनी सांगितले.

याआधीही 2016 मध्ये त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. त्यादरम्यान त्यांची तब्येत खालावली होती. या हल्ल्यादरम्यान तो मधमाश्यांच्या पोळ्यातून मध चोरण्यासाठी गेला होते. पण काही गडबड झाल्याने त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला चढवला. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.