AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Sadh | ‘SSR’ने विमान तिकीट क्रमांकाची सुरुवात, अमित साध सुशांतच्या आठवणीने भावूक!

नुकत्याच घडलेल्या घटनेची आठवण करुन अमितने पुन्हा एकदा सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Amit Sadh | ‘SSR’ने विमान तिकीट क्रमांकाची सुरुवात, अमित साध सुशांतच्या आठवणीने भावूक!
| Updated on: Nov 17, 2020 | 2:08 PM
Share

मुंबई : यावर्षी 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीनही संस्था गुंतल्या आहेत. या सगळ्यात सुशांतच्या चाहत्यांना त्याची खूप आठवण येतेय. तर, एका योगायोगामुळे अभिनेता अमित साधला (Actor Amit Sadh) देखील सुशांतची आठवण आली आहे (Sushant Singh Rajput’s Co-star Actor Amit Sadh Remembering him).

सुशांत सिंह राजपूत सारख्या तेजस्वी अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूचा आपल्यावर परिणाम होत नसेल, तर आपण माणूसच नाही, असे म्हणत अमित साध याने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेची आठवण करुन अमितने पुन्हा एकदा सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

SSR शब्दांचा योगायोग

अमित साध चित्रीकरण आटोपून कुल्लूहून मुंबईला येत होता. या प्रवासादरम्यान त्याच्या विमान तिकिटाचा क्रमांक ‘एसएसआर’ या शब्दांनी सुरू झाला. हा योगायोगा आठवून तो म्हणाले, ‘कुल्लूतून मुंबईकडे येताना माझ्या तिकिटावरील अनुक्रमांक एसएसआरने सुरू होत होता. सुरुवातीला ते माझ्या लक्षात आहे नाही. मात्र, मग मला समजले की, हा नंबर फक्त मलाच मिळाला आहे. मला वाटतं की, कोरोना व्हायरसच्या प्रभावानंतर चित्रपट क्षेत्रात खूप बदल झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरही चित्रपटसृष्टीवर परिणाम झाला आहे. मला वाटतं की, याचा परिणाम आपल्या प्रत्येकावर झाला आहे. जर, आपल्यावर याचा परिणाम झाला नसेल, तर आपण माणूस नाही.’(Sushant Singh Rajput’s Co-star Actor Amit Sadh Remembering him)

(Sushant Singh Rajput’s Co-star Actor Amit Sadh Remembering him)

अमित साधने 2013मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘का पो छे!’मध्ये सुशांतबरोबर काम केले होते. अभिषेक कपूरचा हा चित्रपट दोन्ही अभिनेत्यांच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरला होता (Sushant Singh Rajput’s Co-star Amit Sadh Remembering him).

अमित नुकताच अ‍ॅमेझॉन प्राईमची वेब सीरीज ‘ब्रीथः इन टू द शेडो’ मध्ये दिसला होता. अभिषेक बच्चनसोबत काम करण्याच्या त्याच्या अनुभवही त्याने शेअर केला. अभिषेक एक उत्तम व्यक्तिमत्व असल्याचे अमित म्हणाला. अमित म्हणाला, ‘तो माझा सिनिअर आहे. परंतु, त्याच्याबरोबर काम करणे खरोखरच छान वाटते.’

दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांना सुशांतची आठवण

दिवाळीच्या (Diwali 2020) दिवशी सुशांतच्या चाहत्यांनाही त्यांची खूप आठवण येत होती. दिवाळीच्या खास दिवशी काही चाहत्यांनी सुशांतच्या घराबाहेर दिवा लावला होता. सुशांतच्या स्मरणार्थ शुक्रवारी त्याची एक चाहती त्याच्या मुंबईतील घराबाहेर पोहोचली होती. या ‘लेडी फॅन’ने सुशांतच्या स्मरणार्थ त्याच्या घराबाहेर दिवा लावला होता. सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती यांनी या महिला फॅनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

(Sushant Singh Rajput’s Co-star Actor Amit Sadh Remembering him)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.