Sushant Singh Rajput | दिवाळीतही चाहत्यांकडून सुशांत सिंह राजपूतसाठी न्यायाची मागणी, बहीण श्वेता म्हणाली…

दिवाळी साजरी करत असतानाही दिवंगत भावाला प्रार्थनेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिल्याबद्द्ल श्वेताने सगळ्यांना धन्यवाद म्हटले आहे.

Sushant Singh Rajput | दिवाळीतही चाहत्यांकडून सुशांत सिंह राजपूतसाठी न्यायाची मागणी, बहीण श्वेता म्हणाली...

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) बहीण श्वेता सिंह किर्ती (Shweta singh kirti) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. भावाच्या निधनानंतर ती सोशल मीडियाद्वारे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे. श्वेता सिंह कीर्तीच्या या लढ्यात सुशांतचे चाहते सुद्धा नेहमीच तिला खंबीर पाठिंबा देतात. दिवाळी सणाच्या काळातही चाहत्यांनी ही न्यायाची लढाई वेगवेगळ्या पद्धतीने सुरू ठेवली होती. यासाठी सुशांतची बहीण श्वेताने सगळ्या चाहत्यांना आभार मानले आहेत (Sushant Singh Rajput’s sister Shweta singh kirti thanks fans).

सोशल मीडियाद्वारे श्वेता सिंह कीर्तीने त्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. दिवाळी साजरी करत असतानाही दिवंगत भावाला प्रार्थनेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिल्याबद्द्ल श्वेताने सगळ्यांना धन्यवाद म्हटले आहे. दिवाळीच्या काळात सुशांतच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी सुरू केलेली न्यायाची लढाई कशाप्रकारे सुरू ठेवली, याचा एका व्हिडीओ श्वेता सिंह कीर्तीने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांतचे चाहते त्याला वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

(Sushant Singh Rajput’s sister Shweta singh kirti thanks fans)

हा व्हिडीओ शेअर करताना श्वेताने लिहिले, ‘ही सुशांतची दिवाळी आहे. असाच होता तो. मी त्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते, ज्यांनी माझ्या भावाला प्रार्थनेत आणि हृदयात ठेवून ही दिवाळी साजरी केलेली आहे. तुम्ही लोक आमचे कुटुंब आहात. या मार्गातील प्रत्येक पावलावर तुमचे प्रेम आणि समर्थन आम्हाला जाणवले आहे, धन्यवाद.’

जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये, चाहते सुशांतला श्रद्धांजली देताना, रांगोळी काढत असताना, त्याच्या फोटोसमोर मेणबत्ती लावत असताना दिसून आले आहेत (Sushant Singh Rajput’s sister Shweta singh kirti thanks fans).

लेडी फॅनकडून सुशांतच्या घराबाहेर दीपप्रज्वलन

सुशांतच्या स्मरणार्थ त्याची एक चाहती त्याच्या मुंबईतील घराबाहेर पोहोचली. या ‘लेडी फॅन’ने सुशांतच्या स्मरणार्थ त्याच्या घराबाहेर दिवा लावला.

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती यांनी या महिला फॅनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोत सुशांतची ही फॅन हातात दिवा घेऊन त्याची अपार्टमेंट ‘मॉन्ट ब्लँक’च्या बाहेर उभी आहे. हे चित्र पोस्ट करताना श्वेता सिंह कीर्ती यांनी लिहिले की, ‘हो, आम्हाला या व्यवस्थेवर ठाम विश्वास आहे आणि आम्ही न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू’. (Sushant Singh Rajput’s sister Shweta singh kirti thanks fans)

सीबीआयचा तपास अंतिम टप्प्यात

गळफास घेत सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी आयुष्य संपवले. मात्र, त्याच्या चाहत्यांसह कुटुंबियांनीदेखील ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. आता या प्रकरणातील सीबीआय तपास अंतिम टप्प्यात आहे. एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यू फाशी आणि गुदमरल्यामुळे झाला असल्याचे म्हटले आहे

त्याच वेळी, या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आला आहे. ज्यानंतर बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार या प्रकरणात अडकल्याचे लक्ष्यात आले. यानंतर एनसीबीने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल यांची चौकशी देखील केली. तर, सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. यापैकी रियाला सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, शौविक अद्याप तुरुंगात आहे.

(Sushant Singh Rajput’s sister Shweta singh kirti thanks fans)

Sushant Singh Rajput | आपल्या एकीतच बळ आहे आणि ते असेच राहू द्या, सुशांतच्या बहिणीचे चाहत्यांना भावनिक आवाहन!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI