AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी, आज संशयास्पद बॅग सापडली

नाशिक: देवळाली स्टेशन उडवून देण्याच्या धमकीनंतर आता स्टेशनबाहेरच संशयास्पद बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. देवळाली स्टेशन (deolali) उडवून देऊ असं निनावी पत्र कालच आलं होतं. त्यांनतर आज सकाळी ही संशयास्पद बॅग सापडली. यानंतर श्वानपथक आणि बीडीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली. या पथकाकडून संशयित बॅगची तपासणी करण्यात येत आहे. संशयित बॅग सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, […]

आधी देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी, आज संशयास्पद बॅग सापडली
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

नाशिक: देवळाली स्टेशन उडवून देण्याच्या धमकीनंतर आता स्टेशनबाहेरच संशयास्पद बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. देवळाली स्टेशन (deolali) उडवून देऊ असं निनावी पत्र कालच आलं होतं. त्यांनतर आज सकाळी ही संशयास्पद बॅग सापडली. यानंतर श्वानपथक आणि बीडीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली. या पथकाकडून संशयित बॅगची तपासणी करण्यात येत आहे. संशयित बॅग सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, बॉम्बशोधक आणि श्वानपथकाने अर्धा तास तपासणी करुन, ही बॅग उघडली. सुदैवाने या बॅगेत घातक असं काही सापडलं नाही. या बॅगमध्ये काही कागदपत्र आणि कपडे सापडली. संशयास्पद काही न आढळल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बॅगेची अर्धा तासांपासून तपासणी सुरु होती.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली हे भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील देवळाली इथं भारतीय लष्कराचं आर्टिलरी सेंटर अर्थात तोफखाना विभागाचं महत्त्वाचं केंद्र आहे. त्यामुळे देवळालीला सुरक्षेचं कवच नेहमीच असतं.  12 फेब्रुवारीला लष्कराच्या जवानांनी देवळाली इथं चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवली होती. शिस्तबद्ध प्रात्यक्षिकाद्वारे जवानांनी उपस्थितांची मनं जिंकली होती.

देवळाली महत्त्वाचं का?

नाशिक जिल्ह्यात देवळाली लष्करी छावणी आहे. हजारो एकर जागेवर ही छावणी पसरली आहे. या छावणीत तोफखान्याचे प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव केंद्र आहे. तोफांच्या सरावासाठी या छावणीत ‘फायरिंग रेजं’ सुद्धा आहेत. ‘आर्मी एव्हिएशन स्कूल’ ही लष्करी अधिकाऱ्यांना वैमानिाचे प्रशिक्षण देणारी संस्थाही आहे. दारुगोळ्याचे साठवणूक केंद्र सुद्धा इथेच आहे. देवळाली लष्करी छावणीचा काही भाग महापालिका क्षेत्रा ततर काही शहराबाहेर आहे. अत्यंत संवेधनशील असा हा परिसर आहे.

देवळाली लष्करी छावणीत काय काय आहे?

  • तोफखान्याचे प्रशिक्षण केंद्र
  • आर्मी एव्हिएशन स्कूल
  • दारुगोळ्याची साठवणूक केंद्र
  • लष्कर सामग्री असणारे महत्त्वाचे केंद्र

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.