बर्फीत भेसळ, कारखान्यावर धाड, 1 लाख 19 हजारांची बर्फी जप्त

नागपुरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईत भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केली.

बर्फीत भेसळ, कारखान्यावर धाड, 1 लाख 19 हजारांची बर्फी जप्त

नागपूर : नागपुरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईत भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर (Sweet Adulteration ) पोलिसांनी कारवाई केली. या विक्रेत्याच्या अवैध मिठाई कारखान्यावर धाड टाकून 553 किलो बर्फी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत जप्त केली (Sweet Adulteration ).

बर्फीमध्ये भेसळ करणाऱ्या मिठाई विक्रेत्यावर नागपुरात कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 1 लाख 19 हजार रुपयांची 553 किलो बर्फी जप्त करण्यात आली. नागपूरच्या वाडी नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या लावा गावात एका भाड्याच्या घरात हा अवैध मिठाई कारखाना सुरु असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. माहितीवरुन विभागाने लावा गावातील या कारखान्यावर धाड टाकली.

मेघराज राजपुरोहित (42 वय) नावाच्या व्यक्तीने हा कारखाना गेल्या 3-4 दिवसांपासून सुरु केला होता. त्याच्याकडे मिठाई निर्मितीचा कुठलाही परवाना नव्हता. यावेळी दूध पावडर, तयार बर्फी आणि सॅफोलाईट (Safolite) नावाचा 400 ग्राम रासायनिक पदार्थ देखील प्राप्त झाला.

सफोलाईट हा पदार्थ आरोग्याला घातक असून तो भट्टी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे राजपुरोहितने सांगितले. परंतु हा रासायनिक पदार्थ मिठाईमध्ये वापरत असल्याचा संशय अन्न व औषध विभागाला आहे. पोलीस आणि अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार बर्फी आणि इतर साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेतय यावेळी सुमारे 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Sweet Adulteration

संबंधित बातम्या :

ऐन दिवाळीत पती-पत्नीमध्ये टोकाचा वाद, पत्नीवर चाकू हल्ला करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

डोक्यावर 12 लाखांचं बक्षीस, जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला 10 वर्षांनी अटक

टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा, पुण्यातील तिघांना कोल्हापुरात अटक

Published On - 5:29 pm, Thu, 12 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI