AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तानाजींच्या वंशजाला आर्थिक हातभार, रायबा मालुसरेंना अतुल भोसलेंची मदत

रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी साताऱ्यातील कराडच्या शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी 50 हजार रुपयांची मदत दिली.

तानाजींच्या वंशजाला आर्थिक हातभार, रायबा मालुसरेंना अतुल भोसलेंची मदत
| Updated on: Feb 25, 2020 | 8:22 AM
Share

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे उद्गार काढून ज्यांच्या हौतात्म्याचा गौरव केला, त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज असणारे रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी हातभार लावला. (Tanaji Malusare Descendants receives help)

नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज असणाऱ्या रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी साताऱ्यातील कराडच्या शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी 50 हजार रुपयांची मदत दिली.

कराड तालुक्यातील शेतकरी प्रसारक शिक्षक मंडळच्या माध्यमातून शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या थेट बाराव्या वंशज शीतल शिवराज मालुसरे यांना सन्मानित करण्यात आले, तर रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी अतुल भोसले यांनी दिलेली 50 हजारांची मदत शीतल मालुसरे यांनी स्वीकारली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार, प्रेरणेवर काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी छत्रपतींसोबत काम केलेल्या मावळ्यांच्या वंशजाना मदत केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली. भोसले हे 2019 मधील लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांविरोधात निवडणूक लढवली होती.

‘अतुल भोसले यांनी केलेली मदत अनमोल आहे. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही. रायबाचे शिक्षण आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे.’ अशा भावना शीतल मालुसरे यांनी व्यक्त केल्या.

‘मी सोबत आणलेली समुद्र कवड्यांची माळ घरात ठेवून लोकांच्या उपयोगी पडणारी नाही. परंपरागत सासूकडून सूनेला दिली जाणारी ही माळ, दागिन्याच्या पेटीत ठेवण्यापेक्षा सर्वांना तिचं दर्शन घडत असेल, तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’ असं शीतल मालुसरे म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात असलेली ही माळ शीतल मालुसरेंनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दर्शनासाठी आणली होती. (Tanaji Malusare Descendants receives help)

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित ‘तान्हाजी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमामुळे तानाजींची शौर्यगाथा दृकश्राव्य माध्यमातूनही सामान्यांपर्यंत पोहचली आहे.

Follow Us
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.