AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रखुमाईचं मुखदर्शन बंद राहणार, कार्तिकी एकादशी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील 6 विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे.

25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रखुमाईचं मुखदर्शन बंद राहणार, कार्तिकी एकादशी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय
| Updated on: Nov 22, 2020 | 2:31 PM
Share

पंढरपूर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर आणि लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचं सध्या सुरु करण्यात आलेलं मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आला आहे. मात्र, देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. (Temple of Vitthal-Rukmini between 25th to 27th November Closed for devotees)

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील 6 विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. 23 आणि 24 नोव्हेंबरला विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन सुरु असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्थाही सुरु आहे. तर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद असलेलं मुखदर्शन पुन्हा 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीनं दिली आहे.

विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार- अजितदादा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं. पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी अजित पवार आज पुण्यात आहेत.

दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही

यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नुकतंच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून यंदाही पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा देवस्थानात करायचे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन होणार आहे. त्यामुळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

कार्तिकी एकादशीनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

Temple of Vitthal-Rukmini between 25th to 27th November Closed for devotees

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.