जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या 3 नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

जम्मू काश्मीर पोलिसांनी तिघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या 3 नेत्यांची गोळ्या झाडून हत्या


जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) तीन नेत्यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. कुलगाममधील वायके पोरा इथं दहशतवाद्यांनी फिदा हुसैन इट्टू, उमेर राशिद बेग आणि उमेर हनान यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी तिघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. (terrorists attack in jammu kashmir 3 bjp workers killed in kulgam)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. हा संपूर्ण परिसत पोलिसांनी घेरला असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर भाजपने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. फिदा हुसैन इट्टू भारतीय जनता युवा मोर्चाचे कुलगाम जिल्हा महासचिव होते. उमेर राशिद बेग हे कुलगाम जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य होते तर उमेर हनान हे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस होते.

 


या हल्ल्यानंतर पक्षानं म्हटलं आहे की, या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही. जम्मू-काश्मीर भाजपाने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘हे कृत्य दहशतवाद्यांच्या निकृष्ट प्रतिबिंब आहे. देव दिवंगत लोकांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यास सामर्थ्य देवो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. ” (terrorists attack in jammu kashmir 3 bjp workers killed in kulgam)

 

याआधीही जम्मू काश्मारमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांवर हल्ले झाले आहेत. याच वर्षा जुलै महिन्यामध्ये दहशतवाद्यांनी बांदीपोरामध्ये माजी जिल्हा अध्यक्ष वसीम अहमद बारी, त्याचे वडिल आणि भावाची हत्या करण्यात आली होती. मागच्या महिन्यात कुलगाममध्ये भाजप नेता आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे याचीही दहशतवाद्यांनी गोळी घालून हत्या केली होती.

इतर बातम्या – 

राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे

एका चुकीमुळे गमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी

(terrorists attack in jammu kashmir 3 bjp workers killed in kulgam)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI