राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे

मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे

जळगाव : राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले आहेत. पद मिळालं तरी काम करणार आहे आणि नाही मिळाले तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. (if NCP gives MLA or MP post will be my pleasure said Eknath Khadse)

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही टोला लगावला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणताही नेता भाजपाला सोडून जाणार नाही असं मत गिरीश महाजन यांनी काल जळगावी व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे हे आगामी काळात दिसेलच. पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून असं विधान करावं लागतं अशी प्रतिक्रिया देत आगामी काळात राष्ट्रवादी व भाजपमधील सत्ता संघर्षाचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

खरंतर, खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणतं पद देणार यावर राजकीय वातावरण तापलं आहे. यातच राज्यपाल नियुक्त 12 जागाांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सदस्यांची यादी तयार केली आहे. त्यात भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आदिती नलवाडे आणि प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे यांची नावं चर्चेत असून राज्यपाल नियुक्त जागेवर विविध समाज घटकातील चेहऱ्यांना संधी देऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (if NCP gives MLA or MP post will be my pleasure said Eknath Khadse)

राज्यपाल नियुक्त सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना राष्ट्रवादीने सामाजिक समीकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, आदिती नलावडे आणि शिवाजी गर्जे या चार जणांना विधान परिषदेवर पाठवणअयात येणार असल्याची चर्चा आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनाही विधान परिषदेत पाठवण्याच्या राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. खडसेंना विधान परिषदेवर पाठवून एक दगडात अनेक पक्षी मारण्याची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खेळी असल्याचं बोललं जात आहे.

इतर बातम्या – 

‘राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार, पण मुख्यमंत्रीही संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतायत’
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रेल्वे टेंडरच्या नावे गंडा घालणाऱ्या गँगचा पर्दाफाश

(if NCP gives MLA or MP post will be my pleasure said Eknath Khadse)

Published On - 9:44 pm, Thu, 29 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI