'राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार, पण मुख्यमंत्रीही संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतायत'

आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे राज ठाकरे यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. | Dada Bhuse

'राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार, पण मुख्यमंत्रीही संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतायत'

मुंबई: राज ठाकरे यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील संकटात सापडलेल्या जनतेला मदत करतच आहेत, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे राज ठाकरे यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत. त्यामुळे मला या सगळ्यावर अधिक काही बोलायचे नाही, असे दादा भुसे यांनी सांगितले. (Shivsena leader Dada bhuse comment on Raj Thackeray criticism on Uddhav Thackeray)

राज्यातील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि कांदा उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यानंतर कांदा खरेदीच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय झाला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी केंद्र सरकारशी चर्चा करून कांद्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे दादा भुसे यांनी सांगितले.

तर या बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने आमच्या मनात संतापाची भावना आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या बैठकी होतात, तरीही निर्णय होत नाहीत. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आता आम्ही काय करायचं? आम्ही अंमली पदार्थ विकतोय का, असा उद्विग्न सवाल एका शेतकऱ्याने विचारला. त्यामुळे आता याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा. जेणेकरून कांदा व्यापारी आमचा माल विकत घेतील, असेही या शेतकऱ्याने सांगितले.

तर कांदा व्यापाऱ्यांनी या बैठकीनंतर सकारात्मक भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीला मान देऊन आम्ही शुक्रवारपासून कांदा लिलाव करत आहोत. मात्र, आम्हाला केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करावे लागतेय. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने केंद्राशी बोलणी करुन यावर तोडगा काढावा, अशी मागणी नंदकुमार डांगा या व्यापाऱ्याने केली.

संबंधित बातम्या:

Special Report | राज ठाकरेंच्या राज्यपाल भेटीचा अर्थ काय? राज्यपाल राज भेटीसाठी उत्सुक का?

Raj Thackeray Update | राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या : राज ठाकरे

राज्य सरकार अडलंय कुठं? धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगा : राज ठाकरे

(Shivsena leader Dada bhuse comment on Raj Thackeray criticism on Uddhav Thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *