'कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सकारात्मक चर्चा, उद्धव ठाकरे उद्या केंद्र सरकारशी बोलणार'

"आम्हाला निर्णय लवकर पाहीजे. आमचा कांदा लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी घेतला पाहीजे", अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली (Onion growers meet CM Uddhav Thackeray).

'कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सकारात्मक चर्चा, उद्धव ठाकरे उद्या केंद्र सरकारशी बोलणार'

मुंबई : कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी आणि साठवणूक क्षमतेवर मर्यादा घातल्यानंतर राज्यभर कांदा प्रश्न तापला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (29 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत कृषीमंत्री दादा भुसेदेखील उपस्थित होते (Onion growers meet CM Uddhav Thackeray).

बैठकीनंतर दादा भुसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्या कांदा उत्पादकांसंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहेत”, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

दरम्यान, या बैठकीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीदेखील ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आमच्या मनात संतापाची भावना आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं खूप मोठ नुकसान होत आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या बैठका होतात. तरी तोडगा का निघत नाही? दिवाळीचा सण तोंडावर आला असताना आम्ही करायचं काय? आम्ही अंमली पदार्थ विकतोय का? आम्ही कांदा शेती बंद करायची का?”, असे सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले.

“आम्हाला निर्णय लवकर पाहीजे. आमचा कांदा लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी घेतला पाहीजे”, अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली (Onion growers meet CM Uddhav Thackeray).

केंद्र सरकारने कांद्याची साठवणूक क्षमता आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. मागील चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल (28 ऑक्टोबर) नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कांदा प्रश्नावर भूमिका मांडली होती. कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं शरद पवार म्हणाले होते. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं होतं.

हेही वाचा :

व्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी

व्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *