व्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार

राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.

  • चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 13:54 PM, 28 Oct 2020
NCP Supremo Sharad Pawar will go to Ruby hospital to meet MLA Bharat Bhalke

नाशिक: राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. (sharad pawar addressing press conference on onion issue)

शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांना पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कांदाप्रश्नी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये, कारण त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असं सांगतानाच कांदा व्यापाऱ्यांवर धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत. या व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही, असं पवार म्हणाले. निर्यात बंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात, याकडेही त्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर विरोधकांनी सभागृहात ‘शरद पवार होश मे आव’ अशा घोषणा दिल्या होत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची वेळ येते तेव्हा संसदेत चळवळ होते, असंही ते म्हणाले. स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात आज मी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. कांद्याचा थोडा भाव वाढला की इन्कम टॅक्सवाल्यांच्या काही गोष्टी ऐकू येतात, मार्केट चालू ठेवा, अडचणी एकत्र बसून सोडवू, तुम्हाला त्रास झाला म्हणून उत्पादकाला त्रास व्हावा अशी तुमची भावना नाही. त्यामुळे थोडं नमतं घ्या, असा सल्लाही त्यांनी कांद्याच्या व्यापाऱ्यांना दिला आहे. (sharad pawar addressing press conference on onion issue)

संबंधित बातम्या:

LIVE | शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार

(sharad pawar addressing press conference on onion issue)