व्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी

भाजप खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना कांद्याची साठणूक क्षमता वाढवू द्यावी अशी मागणी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. (BJP MP Dr. Bharti Pawar's demand to increase onion storage capacity)

व्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी, भाजप खासदार डॉ. भारती पवार यांची मागणी

नाशिक : कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी आणि साठवणूक क्षमतेवर मर्यादा घातल्यानंतर राज्यभर कांदा प्रश्न तापला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून कांद्यावरील निर्बंध उठवावेत अशी मागणी होत आहे. त्यातच भाजप खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना साठणूक क्षमता वाढवू द्यावी अशी मागणी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. तसेच पुढील दहा दिवसांत व्यापाऱ्यांना कांदा विक्री करण्यास संधी द्यावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. (BJP MP Dr. Bharti Pawar’s demand to give permission to increase onion storage capacity)

केंद्र सरकारने कांद्याची साठवणूक क्षमता आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे खासदार डॉ. भारती पवार यांनी रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक क्षमतेत वाढ करु द्यावी तसेच कांदा पुढील दहा दिवसांत विकण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

राज्यात तसेच देशात कांद्याचे भाव वाढले असून सर्वसामान्यांना त्याची झळ सोसावी लागत आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळेच बाजारात कांद्याचे दर (Onion Price) वाढले. नवरात्रीत उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कांद्याची मागणी घटली. तरीदेखील कांद्याच्या किमतीत कोणतीही घट झालेली दिसली नाही. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता अशा प्रमुख शहरांतदेखील कांदा महागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी व्हावेत म्हणून 21 ऑक्टोबरला कांदा आयातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली. तसेच देशातील व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्या.

दरम्यान, कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये सांगितलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

व्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

(BJP MP Dr. Bharti Pawar’s demand to give permission to increase onion storage capacity)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *