वेश्या व्यवसायातील महिलांना सरकारचा मोठा दिलासा; दरमहा आर्थिक मदत मिळणार

राज्यातील एकूण 30,901 महिलांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल. | Thackrey govt

वेश्या व्यवसायातील महिलांना सरकारचा मोठा दिलासा; दरमहा आर्थिक मदत मिळणार
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:40 AM

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ ओढावलेल्या वेश्या व्यवसायातील (Sex workers) महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळात या महिलांना दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर ज्या महिलांची मुले शाळेत जातात त्यांना अतिरिक्त 2500 रुपयांची मदत दिली जाईल. महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयामुळे वेश्या व्यवसायातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Thackrey govt will give financial aid to Sex workers)

राज्य सरकारने या अनुदानासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. राज्यातील एकूण 30,901 महिलांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल. शासनाकडून गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.

लॉकडाऊनच्या काळात वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे या महिलांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने आणखी काही दिवस या महिलांची आर्थिक परवड सुरुच राहण्याची शक्यता आहे. ही अडचण ओळखून राज्य सरकारने या महिलांना आर्थिक मदत देऊ केली आहे.

वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक सहाय्य यासारख्या मुलभूत सेवा पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल. या समितीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडील एक प्रतिनिधी, महिला पोलीस अधिकारी आणि निमंत्रित सदस्य म्हणून स्वयंसेवी संघटनांचा प्रतिनिधी यांचा समावेश असेल.

महाराष्ट्रात आज ६,४०६ नव्या करोनाबाधितांची नोंद

राज्यात गुरुवारी ६ हजार ४०६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 65 जणांचा मृत्यू झाला. 4 हजार 815 जणांना आज उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 2 हजार 365 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 16 लाख 68 हजार 538 जणांनी करोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे 46 हजार 813 जणांचा मृत्यू झाला असून 85 हजार 963 अ‍ॅक्टिव केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

संबंधित बातम्या:

दिल्लीत शरीरविक्री करणाऱ्या महिलांना नवी दिशा, कोरोना मास्क निर्मितीचे काम हाती

Pune Budhwar Peth | बुधवार पेठेत कोरोनाची एन्ट्री, गर्भवतीसह पाच जणांना कोरोना

कोपरी स्टेशन परिसरातील देहविक्रय व्यवसाय आठ दिवसात बंद करा, अन्यथा मूक मोर्चा, भाजपचा इशारा

(Thackrey govt will give financial aid to Sex workers)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.