….म्हणून Facebook, Instagram आणि WhatsApp झाले होते तब्बल सात तास ठप्प

इंटरनेट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार फेसबुकच्या सगळ्या सर्विस बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमुळे (BGP) डाऊन झाल्या होत्या.

....म्हणून Facebook, Instagram आणि WhatsApp झाले होते तब्बल सात तास ठप्प
Facebook
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 12:09 PM

मुंबई : जवळपास सात तासांच्या प्रतीक्षेनंतर डाऊन झालेले (Server Down) फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp पुन्हा नेटकर्यांसाठी सुरू झाले. मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे जगभरातून अनेकांचे नुकसान झालेले पहायला मिळाले. सेवा पूर्ववत झाल्यावर फेसबुकने रात्री यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, तुम्हाला सेवा पुरविण्यासाठी आम्ही काम करत आहोत, आणि सांगण्यास आनंद होत आहे की तुम्ही पुन्हा ऑनलाईन येऊ शकता. (On 4 october Facebook, Instagram and WhatsApp were jammed for seven hours)

फेसबुक, इंस्टाग्राम आणि WhatsAppची सेवा ठप्प असल्याकारणाने लोकांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने माफी मागीतली. तसेच, वापरकर्त्यांनी अॅप परत येण्यासाठी इतका वेळ प्रतीक्षा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मात्र कंपनीने सर्वर डाऊन होण्यामागचे कोणतेही कारण सांगितले नाही. इंटरनेटच्या मुख्य मुद्द्यांवर नजर ठेवणारा डाउनडेटेक्टर या घटनेवर सांगतात, “जगभरात 10.6 मिलियनपेक्षा जास्त अहवालांसह, फेसबुकची पडझड ही आतापर्यंतची सर्वात मोठी आउटेज होती.”

फेसबुकच्या शेअर्समध्ये 4.8 टक्क्यांची घसरण

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याला फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp बंद पडल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. तांत्रिक बिघाडामुळे तिन्ही अॅप सोमवारी (4 ऑक्टोबर) तब्बल सात तास बंद राहिले. त्यामुळे शेअर बाजारात फेसबुकच्या समभागांची किंमत झपाट्याने खाली आलेली पहायला मिळाली. फेसबुकचा समभाग जवळपास 4.8 टक्क्यांनी खाली आला असल्याने मार्क झुकरबर्गला तब्बल 8.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. याचा मोठा परिणाम म्हणजे जागतिक श्रीमंतांच्या यादीतून मार्क झुकरबर्ग एका क्रमांकाने खाली घसरला. फेसबुकच्या शेअर्सची किंमत सप्टेंबरच्या मध्यापासून 15 टक्क्यांनी खाली घसरली आहे. सोमवारी झालेल्या घसरणीमुळे मार्कची संपत्ती 12,160 कोटी डॉलर्स इतकी झाली असून त्यामुळे मार्क झुकरबर्ग बिल गेटस् यांच्यापेक्षा मागे पडला आहे. मार्क झुकरबर्ग आता जागतिक श्रीमंताच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

संपत्तीच्या नुकसानीसहित कंपनीतील ईमेल सिस्टम आणि फेसबुकच्या काही अंतर्गत एप्लिकेशनचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकचे कर्मचारी सकाळपासून बिल्डिंगमध्ये प्रवेश करू शकत नव्हते, कारण प्रवेशासाठी वापरली जाणारी मशीन काम करत नव्हती. काही इंटरनेट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार फेसबुकच्या सगळ्या सर्विस बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (BGP)मुळे ठप्प झाल्या आहेत. हा इंटरनेटचा रूटिंग प्रोटोकॉल असतो. फेसबुकच्या वेबपेजवरील संदेशातून डोमेन नेम सिस्टीम (DNS) मधील त्रुटीचे वर्णन केले आहे, जे वापरकर्त्यांना वेबसाइटकडे नेण्याची अनुमती देतात.

काय आहे DNS?

DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम (Domain Name System). DNSला इंटरनेटचा आधारस्तंभ मानला जातो. आपण कोणत्याही कॉम्पुटरवर जेव्हा वेबसाइट ओपन करतो तेव्हा त्या वेबसाइटचा आईपी (Website IP) म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल DNS आपल्या ब्राउजरला सांगतो. प्रत्येक वेबसाइटला स्वत:चा आईपी असतो. ट्विटर आणि फेसबुकमध्ये ब्राउजर आपल्या DNSद्वारे त्यांच्या आईपीची माहिती देतो. यामध्ये ट्विटर आणि फेसबुकचा नोंदीकृत DNS जेव्हा मिटतो, तेव्हा आपण ट्विटर आणि फेसबुकचा वापर करू शकत नाही.

हेही वाचा :

फेसबुक, इन्स्टा अन् WhatsApp डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.