भारतीय हवाई दलाचं बळ आणखी वाढवणाऱ्या जीसॅट-7 एचे यशस्वी प्रक्षेपण

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) संप्रेषण उपग्रह जीसॅट-7 एचे यशस्वी प्रक्षेपण केले. बुधवारी सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लाँच पॅडवरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. जीएसएलव्ही-एफ 11 या प्रक्षेपकाव्दारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला, यासाठी मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी याचे 26 तासांचे काउंटडाउन सुरु झाले […]

भारतीय हवाई दलाचं बळ आणखी वाढवणाऱ्या जीसॅट-7 एचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) संप्रेषण उपग्रह जीसॅट-7 एचे यशस्वी प्रक्षेपण केले. बुधवारी सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लाँच पॅडवरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. जीएसएलव्ही-एफ 11 या प्रक्षेपकाव्दारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला, यासाठी मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी याचे 26 तासांचे काउंटडाउन सुरु झाले होते.

या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने भारतीय हवाईदलाची नेटवर्किंग क्षमता वाढणार आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाचे ग्राउंड रडार स्टेशन, विमाने आणि हवाई तळ इंटरलिंक होणार आहे. त्यामुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण हवाई दलासाठी महत्त्वाचे आहे. याआधीही इस्रोने नौसेनेसाठी रुक्मिणी उपग्रह प्रक्षेपित केला होता.

जीसॅट-7 एचे वजन 2250 किलोग्राम आहे. या उपग्रहाला विकसित करण्यासाठी 500 ते 800 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगितले जात आहे. याला 4 सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. या माध्यमातून 3.3 किलोवॅट वीज निर्मीती होऊ शकते. याचं वय आठ वर्ष असणार आहे.

जीएसएलव्ही-एफ 11 जीसॅट-7 एला जियोसिंक्रोनस ट्रांसफर आर्बिट (जीटीओ) मध्ये सोडेल, त्यानंतर तो भूस्थिर कक्षेत स्थिरावेल.

काय आहेत जीसॅट-7 ए ची वैशिष्ट्ये?

  • जीसॅट-7 ए हवाई दलाचे ग्राउंड रडार स्टेशन, विमाने आणि हवाई तळ इंटरलिंक करणार आहे, त्यासोबतच ड्रोन ऑपरेशन्समध्येही याची मदत होणार आहे.
  • 2250 किलोग्राम वजन असलेला हा उपग्रह विकसित करण्यासाठी 500 ते 800 कोटी रुपये खर्च आला.
  • या उपग्रहाला 4 सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. या माध्यमातून 3.3 किलोवॅट वीज निर्मीती होऊ शकते.
  • या उपग्रहाचं वय आठ वर्ष असणार आहे.
  • जीसॅट-7 ए हा इस्रोचा 35 वा सॅटेलाईट आहे.

सध्या पृथ्वीभोवती जगभरातील 320 मिलीटरी सॅटेलाईट फिरत आहेत. यामध्ये जास्तकरुन सॅटेलाईट हे अमेरिका, रशिया आणि चीनचे आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI