AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, 17 पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन

देशभरात कोरोनाने कहर माजवला असताना, तिकडे पंजाबमध्ये अजब घटना (policemen quarantine after thief coronavirus Positive) समोर आली आहे.

चोराला पकडला, वैद्यकीय चाचणीत कोरोना झाल्याचं उघड, 17 पोलीस, न्यायाधीश, कोर्ट कर्मचारी क्वारंटाईन
| Edited By: | Updated on: Apr 09, 2020 | 9:58 PM
Share

चंदीगड : देशभरात कोरोनाने कहर माजवला असताना, तिकडे पंजाबमध्ये अजब घटना (policemen quarantine after thief coronavirus Positive) समोर आली आहे. पोलिसांनी पकडलेल्या एका चोरट्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, त्याला पकडणाऱ्या आणि संपर्कात आलेल्या तब्बल 17 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (policemen quarantine after thief coronavirus Positive). इतकंच नाही तर त्याला कोर्टात हजर केल्याने, न्यायाधीश आणि कोर्ट कर्मचाऱ्यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चोरट्याचा साथीदार पळून गेल्याने त्याची प्रकृती काय आहे आणि तो कुणा कुणाच्या संपर्कात आला आहे, असे गंभीर प्रश्न पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आहेत.

पोलिसांनी सौरव सेहगल या 25 वर्षीय चोरट्याला गाड्यांच्या चोरीप्रकरणात अटक केली होती. दोन स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सौरव सेहगलला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला काल 5 एप्रिलला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याची रवानगी कोठडीत केली. त्याआधी पोलिसांनी त्याला जीवननगर पोलीस स्थानकातील कोठडीत ठेवलं होतं.

त्यानंतर चोरट्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिलला ताप आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत नेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या चोरट्याच्या संपर्कात आलेले तब्बल 17 पोलीस, चोरट्याचे 11 कुटुंबीय आणि सौरवला पकडण्यासाठी मदत करणारे दोन स्थानिक या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

रुग्णालयात नेताना साथीदार पळाला

दरम्यान, सौरवसोबत पोलिसांनी त्याचा साथीदार नवज्योत सिंह (वय 25) यालाही अटक केली होती. तो सुद्धा चेन स्नॅचिंगप्रकरणात आरोपी होता. या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेत असताना, नवज्योत सिंह पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सौरवची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र नवज्योतच्या प्रकृतीची अधिक चिंता आहे, कारण तो कुणा कुणाच्या संपर्कात आला हे अद्याप समजलेलं नाही.

पोलीस अधिकारी गुरमीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सौरव सेहगल याची प्रकृती काहीशी ठिक नव्हती, मात्र नवज्योत फिट होता. या दोघांना आयसोलेशन वॉर्डात नेलं होतं. तिथे मी नवज्योतच्या बेड्या काढताच, त्याने मला धक्का देऊन तो पळून गेला”.

संपर्कात आलेले पोलीस आणि फिल्मी कहाणी

तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI), दोन हेडकॉन्स्टेबल, दोन कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्ड हे पाच आणि सहा एप्रिलला आरोपी सौरव सेहगलच्या संपर्कात आले होते. या चोरट्याची माहिती माध्यमांना देण्यासाठी आणि त्याचा फोटो काढण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा तिथे त्याचा संपर्क पोलीस निरीक्षक आणि आणखी एका हेड कॉन्स्टेबलशी आला. मग कोर्टात हजर करताना आणखी तीन पोलिसांचा त्याच्याशी संपर्क आला. मग त्याचे फिंगरप्रिन्ट्स किंवा हाताचे ठसे घेताना एक महिला पोलीस आणि दोन कॉन्स्टेबलचा संपर्कात आला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.