हे पहिल्यांदा घडतंय : इंडोनेशियात सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केल्यास शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा

इंडोनेशियात जर कुणीही आता सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केलं, तर त्याला टॉयलेट साफ करण्याची शिक्षा दिली जाणार आहे.

हे पहिल्यांदा घडतंय : इंडोनेशियात सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केल्यास शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 11:47 PM

मुंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला (First Time In World) आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात (First Time In World) अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. त्याचा हा आढावा

1. अर्जेंटिनाच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेचं कामकाज ऑनलाईन पद्धतीनं पार पडलं. एकूण 72 खासदारांपैकी 70 खासदारांनी ऑनलाईनद्वारे संसदेत उपस्थित लावली. यासाठी संसदेत दोन मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. दोन्ही स्क्रिनमध्ये सभापतींची स्क्रिनसुद्धा लावण्यात आली होती. एका माहितीनुसार, सध्या जगातल्या 23 देशांच्या संसदेत अशाच प्रकारे चर्चा आयोजित केली जात आहे. दरम्यान, अर्जेंटिनात 6 हजारांहून जास्त लोकांना कोरोना झाला.

2. न्यूझीलंडनं लॉकडाऊन हटवल्यानंतर लोकांनी दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री 12 वाजता सुद्धा कटिंगच्या दुकानाबाहेर रांग लागल्याचं पाहायला मिळालं. वेलिंगटन, क्राइस्टचर्चसारख्या अनेक ठिकाणच्या सलून दुकानांवर लोकांनी गर्दी केली. सलग 3 दिवस कोरोनाचा एकही रुग्ण न सापडल्यामुळे न्यूझीलंडन अनेक उद्योग सुरु केले आहेत. मात्र, लोकांना विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन सुद्धा केलं.

3. इंडोनेशियात जर कुणीही आता सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केलं, तर त्याला टॉयलेट साफ करण्याची शिक्षा दिली जाणार आहे. मास्क न लावणाऱ्यांनाही 17 डॉलर्सचा दंड भरावा लागणार असल्याचं गल्फ न्यूजच्या एका बातमीत म्हटलं गेलंय. कोरोनामुळे जगातल्या अनेक देशांनी असे अनेक अजब निर्णय घेतले आहेत. फिलीपाईन्समध्ये तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश आहेत. आणि इंडोनेशियातल्याच एका भागात बाहेर फिरताना कुणी आढळलं तर, त्याला रात्रभर भूतबंगल्यात थांबण्याची शिक्षाही दिली जाते.

4. अमेरिकत काही हॉटेल मालकांनी अनोखा फंडा काढला. सोशल डिस्टंसिंगमुळे लोक सध्या एकएकटं जेवायला येतात. मात्र, त्यांना एकटं पडल्यासारखं वाटू नये, म्हणून समोरच्या रिकाम्या खुर्च्यांवर पुतळे बसवण्यात आले आहेत. गार्डियनच्या बातमीनुसार अमेरिकेच्या व्हर्जिनिया शहरातल्या काही हॉटेल मालकांनी ही शक्कल लढवली. यामुळे हॉटेलची क्षमता सुद्धा आपोपाप निम्म्यांवर आली. ज्यामुळे जेवायला येणाऱ्या गिऱ्हाईकाबरोबरच हॉटेलमधल्या लोकांची सुरक्षा सुद्धा राखली जाते.

5. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मेलेल्या लोकांमध्ये तब्बल 26 टक्के रुग्ण हे डायबेटिक असल्याचं समोर आलं. ब्रिटनमध्ये जगात पहिल्यांदाच कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे तपशीलवाहर अहवाल समोर आले आहेत. ज्यातून ही माहिती समोर आली. ब्रिटनमध्ये मार्चपासून जे मृत्यू झाले आहेत, त्यांचा आकडा समोर आला. ज्यात 26 टक्के बायबेटिक रुग्ण, 18 टक्के लोकांना डिमेंशियाचा त्रास होता. तर 15 टक्के लोकांना फुप्फुसाशी निगडीत कोणत्या ना कोणत्या समस्या होत्या.

6. चीनच्या शेअर बाजारात अमेरिकेनं गुंतवलेला पेन्शन निधी काढून घेण्यास अमेरिका पाऊलं टाकू लागली. यामुळे चीनी शेअर बाजाराला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातो.चीनच्या शेअर बाजारात अमेरिकेची अरबो डॉलरची गुंतवणूक आहे. चीनच्या शेअर बाजारात एखाद्या मूळ चीनी कंपनीचा नेमका नफा कधीच सांगितला जात नाही, असाही चीनवर आरोप आहे. (First Time In World)

7. कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत असला तरी अजूनही जगातले 18 देशांमध्ये कोरोना पोहोचलेला नाही. मध्यतंरी या 18 देशांपैकी काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण समोर आल्याचं वृत्त आलं होतं. मात्र तपासणीनंतर संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं. 18 देशांमध्ये फक्त उत्तर कोरियाबाबत जगाला साशंकता आहे. उत्तर कोरिया सोडला तर किरिबीटी, अमेरिकन सामोआ, लेसेथो, मार्शल आयर्लंड, कोमोरोस, मायक्रोनेशिया, नऊरु, पलाऊ, सामोआ, साओ टोमे, टोंगा, तुर्कमेनिस्तान, येमेन अश्या देशात कोरोनाचे एकही रुग्ण नाहीय. वेळीच उपाययोजना, कमी वस्ती आणि विमानानं प्रवास करणाऱ्यांचं कमी संख्या यामुळे या देशांमध्ये कोरोना पोहोचलेला नाही.

8. चार अँटीबॉडी एकत्र करुन कोरोना विषाणूला मारता येणं शक्य असल्याचा दावा चीनी वैज्ञानिकांनी केला. आतापर्यंतच्या संशोधनात चीनी शास्रज्ञांनी ही अनोखी थेअरी मांडली. एका अँटीबॉडिनं कोरोनाला रोखणं शक्य नाही, त्यामुळे चार अँटीबॉडी एकत्र करुन कोरोनावर इलाज शक्य असल्याचं चीनी शास्रज्ञांचं म्हणणं आहे. चारही अँटीबॉडी या कोरोना विषाणूच्या बाहेरच्या आवरणाला नष्ट करतील.

9. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात जागतिक व्यापारात 3 टक्के घट झाली आहे आणि जर कोरोना असाच सुरु राहिला तर एप्रिल ते जून या तिमाहीत ही घट 3 टक्क्यांवरुन थेट 27 टक्के होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार संघटनेच्या एका अहवालातून हा अंदाज वर्तवला गेला. तसं झालं तर कोणत्याही मंदीशिवाय जागतिक व्यापार इतक्या मोठ्या प्रमाणात घटण्याची ही पहिलीच वेळ असेल.

10. फक्त एकट्या भारतात कोरोनाविरोधी लस शोधण्याचे 25 प्रकल्प सुरु आहेत. लोकसत्ताच्या बातमीनुसार वैद्यकीय संस्था आणि स्टार्ट अप यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या 25 प्रकल्पांमध्ये कोरोना विरोधी लस संशोधनाचं काम सुरु आहे. संशोधनाच्या कामासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भागीदारी केली.

First Time In World

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत 12 व्या स्थानी, चीननंतर भारताचा क्रमांक

“हा प्रश्न चीनला विचार” पत्रकाराला दरडावून डोनाल्ड ट्रम्प यांचा काढता पाय

जगात काय घडतंय? चीनमधील वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 45 दिवसानंतर दाम्पत्याला कोरोनाची बाधा

भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.