या घरगुती उपायाने तुमचे केस गुडघ्यापर्यंत लांब होतील

अतुल कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 3:33 PM

रासायनिक प्रदुषणाचा केसांवर वाईट परिणाम होत असतो. अशावेळी योग्य आहार आणि नैसर्गिक उपायांनी केसांचे आरोग्य सांभाळता येते. केसांच्या वाढीसाठी निसर्गाने दिलेल्या अनेक गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत, त्यांचा वापर करता येतो.

या घरगुती उपायाने तुमचे केस गुडघ्यापर्यंत लांब होतील
LONGHAIR
Image Credit source: socialmedia

दिल्ली : केसांचे आरोग्य राखायचे असेल तर महागडे शाम्पू वापरण्यापेक्षा घरातील रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर केल्याने फायदा होत असतो. तांदूळ पाण्याने धुतल्यानंतर उरलेल्या पाण्याचा वापर केसांच्या आरोग्यासाठी करता येताे. घरात भात करताना तयार होणारी पेज वापरून त्याचा वापर केसांसाठी केला तर काही दिवसातच तुमचे केस वेगाने वाढून घनदाट होतील. केसांचे पोषण राखाण्यासाठी चांगला आहार आणि सवयी गरजेच्या आहेतच शिवाय आजी बाईच्या बटव्यातील काही घरगुती उपाय केले तर केसांची वाढ वेगाने होत असते.

आजकल केसांच्या वाढीसाठी अनेक स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर केला जात आहे. त्यात कोरियाई आणि चीनी प्रोडक्ट्समध्ये तांदूळपासून तयार होणाऱ्या घटकांचा वापर केला जातो आहे. तांदूळाच्या पाण्याचा म्हणजे पेजेचा वापरही केसांच्या निगेकरीता होत असतो. त्यामुळे हळूहळू केसांचे आरोग्य सुधारत जाते. कडक ऊन, धुळ, मातीबरोबरच रासायनिक प्रदुषणाचा केसांवर वाईट परिणाम होत असतो. अशावेळी नैसर्गिक उपायांनी केसांची वाढ होते.

केसांसाठी तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी तयार करणे अतिशय सोपे आहे. तांदळाला काही तास भिजवत ठेवावे, त्यानंतर पाण्यातून तांदूळ गाळून घ्यावे. परंतू या पाण्याला फेकू नये. या पांढऱ्या पाण्याचा वापर केसांना धुण्यासाठी होऊ शकतो. तांदुळाला धुतल्यानंतर उरलेल्या पाण्यात खनिज, विटामीन्स असतात. हे पाण्याचा वापराने केसांची त्वचेच्या पेशींची वाढ आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत मिळते.

तांदळाच्या पाण्याचा शाम्पू

चीनच्या हुआंग्लुओ गावाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये समाविष्ठ आहे. कारण या गावातील महिलांचे केस खूपच लांबसडक आहेत. या गावातील महिला केसांच्या आरोग्यासाठी तांदूळ धुतल्यानंतर उरलेले पाणी शाम्पूप्रमाणे वापरतात. महिला तांदुळ शिजविताना तयार होणाऱ्या पेजेचा वापरही केस धुण्याकरीता करतात. इतर कोणतेही कृत्रिम उपाय ते करीत नाहीत.

केस कसे धुवावेत

तांदळाच्या पाण्याचा टोनरसारखा वापर करण्यासाठी आधी केस शाम्पूने धुवावेत. त्यानंतर तांदुळाच्या पाण्याला हातात घेत केसांच्या मूळांना हलकी मालीश करावी. नंतर वीस मिनिटे थांबावे, नंतर केस साध्या पाण्याने धुवावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा, तुमचे केस चांगले दिसतील.

केसांवरील कोंड्यावरचा उपाय

केसांच्या वाढीसाठी तसेच डॅड्रफपासून मुक्ती मिळण्यासाठी तांदळाच्या वापर करता येतो. तांदूळाचे पाणी केसातील कोंडा, शुष्क त्वचा यांच्यावर रामबाण उपाय आहे. त्यासाठी केसांना तांदळाचे पाणी लावून ठेवावे थोडावेळ थांबावे,त्यानंतर केस धुवून टाकावेत. स्प्रेच्या बाटलीतूनही तांदूळाचे पाणी केसांवर फवारता येते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI