नेपाळमध्ये भारताच्या तीन नोटा बंद!

नवी दिल्ली : नेपाळने भारतीय चलनाच्या नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये आजपासून 200, 500 आणि 2000 च्या भारताच्या नव्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बास्कोटा यांनी गुरुवार रात्री यासंबंधीत माहिती दिली. नेपाळ कॅबिनेटने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय चलनाच्या 200, 500 आणि 2000 च्या नोटा […]

नेपाळमध्ये भारताच्या तीन नोटा बंद!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

नवी दिल्ली : नेपाळने भारतीय चलनाच्या नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये आजपासून 200500 आणि 2000 च्या भारताच्या नव्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बास्कोटा यांनी गुरुवार रात्री यासंबंधीत माहिती दिली. नेपाळ कॅबिनेटने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारतीय चलनाच्या 200500 आणि 2000 च्या नोटा नेपाळमध्ये आणणेसोबत बाळगणे तसेच या नोटांचा वापर खरेदी-विक्रीसाठी करणे बेकायदेशीर असेल.

नेपाळी वृत्तपत्र काठमांडू पोस्टनुसारसरकारने नागरिकांना सूचित केले आहे की यानंतर 100 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे भारतीय चलन म्हणजेच 200500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वापर करणे बेकायदेशीर असेल. यानंतर नेपाळमध्ये 100 आणि त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटाच मान्य केल्या जातील. 

दोन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने भारतात नोटबंदी केली होती. तेव्हा जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नेपाळमध्ये भारतीय चलन चालतं. त्यामुळे नोटबंदीनंतर नेपाळच्या बँकांमध्येही मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000 च्या नोटा पडून होत्याज्या भारतात परत आल्या नाहीत. याचा मोठा फटका नेपाळला सहन करावा लागला. अशी समस्या पुन्हा उद्भवू नये याची खबरदारी म्हणून नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला आहे.

भारताच्या नव्या नोटांना नेपाळ सरकारने आतापर्यंत मान्यता दिलेली नव्हतीमात्र त्यांना बेकायदेशीरही ठरवले नव्हते. त्यामुळे या नोटा आतापर्यंत तेथे चलनात होत्या. मात्र आता नेपाळ सरकारने नव्या भारतीय नोटांना कायदेशीररित्या चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळ सरकारच्या या निर्णयाचा प्रभाव नेपाळ पर्यटनावर होऊ शकतो. दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक नेपाळला भेट देतात. मात्र आता भारतीय चलनातील मोठ्या नोटा नेपाळने रद्द केल्याने भारतीय पर्यटकांना व्यवहारात अडचण होणार असल्यानेयाचा परिणाम तेथील पर्यटनावर होऊ शकतो.

यानंतर भारतीयांना नेपाळमध्ये जाताना 100 किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटा नेता येतीलनाहीतर 200500 किंवा 2000 च्या नोटा नेपाळ सीमेवर नेपाळी चलनाशी बदलाव्या लागतील.

या निर्णयाचा परिणाम नेपाळच्या पर्यटनावर होणार असलातरी देशाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं नेपाळ सरकारने सांगितले.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.