नवीन Toyota Fortuner साठी डिलरशीप लेवलवर बुकिंग सुरू, जाणून घ्या फिचर्स

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्यूनरचे दोन अपडेटेड मॉडल्स लाँच करणार आहे.

नवीन Toyota Fortuner साठी डिलरशीप लेवलवर बुकिंग सुरू, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 3:17 PM

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनी आपली सर्वात जास्त विकली जाणारी व्हेईकल इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) आणि फॉर्च्यूनरचे (Toyota Fortuner) दोन अपडेटेड मॉडल्स लाँच करणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 2021 च्या सुरुवातीलाच या एसयूव्ही (SUV) लाँच केल्या जाऊ शकतात. टीम बीएचपीच्या रिपोर्टनुसार काही निवडक टोयोटा डिलर्सने टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टची बुकिंग सुरू केली आहे. मात्र या गाड्या कधी लाँच केल्या जाणार आहेत याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. (Toyota Fortuner 2021 bookings open at dealership level)

या वर्षीच्या सुरुवाताली ही अपडेटेड एसयूव्ही थायलंडमध्ये सादर करण्यात आली होती. नवीन फॉर्च्यूनर सध्याच्या 2.8L डिझेल इंजिनचं पॉवरफुल व्हर्जन असू शकते. अपडेटेड फॉर्च्यूनर 201 bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करु शकते. याच्या ट्रान्समिशनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. अपडेटेड मॉडल 6 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत येईल.

या एसयूव्हीच्या फ्रंट एंडमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. नव्या डिझाईनमध्ये मॅश पॅटर्न ग्रिल, LED DRL सह रिवाइज्ड हेडलँप्स, अपडेटेड फॉग लँप इनक्लोजर, नवे बंपर, सिल्व्हर स्किड प्लेट असू शकते. तसेच यामध्ये नव्या डिझाईनसह एलॉय व्हिल्स असतील.

टोयोटा फॉर्च्यूनर 2021 फेसलिफ्टच्या केबिन मध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल, जी अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्लेला सपोर्ट करेल. तसेच यामध्ये वायरलेस मोबाइल फोन चार्जिंग, एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड फ्रंट सीट्ससारख्या फिचर्सचा समावेश केला जाऊ शकतो. फेसलिफ्ट फॉर्च्यूनरची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असू शकते.

Volkswagen भारतात 2 नव्या SUV लाँच करणार

Volkswagen कंपनी पुढील वर्षी भारतात 2 नव्या SUV लाँच करणार आहे. 2021 च्या पहिल्या सहामाहित Taigun मिड-साईज एसयूव्ही लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरी एसयूव्ही कधी लाँच केली जाणार आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु 2021 च्या दुसऱ्या सहामाहित दुसरी एसयूव्ही लाँच केली जाऊ शकते. दरम्यान सध्या अशा चर्चा आहेत की, फोक्सवॅगन कंपनी ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue), किया सोनेट (Kia Sonet), टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि फोर्ड इकोस्पोर्टसारख्या (Ford EcoSport) गाड्यांच्या स्पर्धेत सब-4 सीटर एसयूव्ही लाँच करु शकते.

कंपनीने दावा केला आहे की, नवीन Taigun स्टायलिंग, टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या बाबतीत मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटचं रि-डिफाईन व्हर्जन असेल. या कारला 1.0 लीटर, 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लीटर TSI EVO इंजिनासह सादर केलं जाऊ शकतं. 1.0 लीटर इंजिनमध्ये 115bhp इतकी पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. तर 1.5 लीटर इंजिनमध्ये 148bhp पाॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

संबंधित बातम्या

MG Motors च्या ‘या’ SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

(Toyota Fortuner 2021 bookings open at dealership level)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.