25 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेक्षाने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, मात्र त्यामध्ये तिने आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केलेला नाही. (TV Actress Preksha Mehta commits suicide)

25 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

भोपाळ : ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी प्रेक्षाने टोकाचं पाऊल उचललं. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास बांधून तिने आयुष्य संपवलं. (TV Actress Preksha Mehta commits suicide)

प्रेक्षाने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, मात्र त्यामध्ये तिने आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात हातात काम नसल्याने प्रेक्षा निराश होती, त्यातून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आत्महत्येपूर्वी प्रेक्षाने इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली होती. “स्वप्न विरुन जाणं, सर्वात वाईट असतं” (सबसे बुरा होता है सपनों का मर जाना) अशा आशयाचं स्टेटस तिने ठेवलं होतं.

हेही वाचा : नवी मुंबईत टीव्ही स्टारचा गळफास, लॉकडाऊनमुळे पैसे थांबले, घरभाडेही रखडल्याने टोकाचं पाऊल

प्रेक्षाने ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेव्यतिरिक्त, ‘मेरी दुर्गा’ आणि ‘लाल इश्क’ अशा टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. मंटो यांनी लिहिलेल्या ‘खोल दो’ या नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या नाटकाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर खूबसूरत बहू, बूंदें, प्रतिबिंबित, पार्टनर्स, थ्रिल, अधूरी औरत अशा अनेक नाटकांमध्ये तिला भूमिका मिळाल्या. (TV Actress Preksha Mehta commits suicide)

लॉकडाऊनच्या काळात कलाकाराने केलेल्या आत्महत्येची दुसरी घटना समोर आली आहे. याआधी अभिनेता मनमीत ग्रेवाल याने आपल्या नवी मुंबईतील निवासस्थानी फॅनला लटकून आत्महत्या केली होती. 32 वर्षीय मनमीत लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. अनेक दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. मनमीतने सब टीव्हीवरील ‘आदत से मजबूर’ आणि ‘कुलदीपक’ मालिकेत काम केलं होतं.

(TV Actress Preksha Mehta commits suicide)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI