Unlock 2 | ‘अनलॉक’चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद?

देशभरात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास सक्त मनाई असून केवळ अत्यावश्यक सेवांचा अपवाद असेल.

Unlock 2 | 'अनलॉक'चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद?
अनिश बेंद्रे

|

Jul 01, 2020 | 10:24 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेला ‘अनलॉक’चा दुसरा टप्पा आजपासून (बुधवार 1 जुलै) सुरु झाला आहे. रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहील, तर इतर ठिकाणी काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. (Unlock Phase Two begins Nationwide)

देशभरात काय सुरु काय बंद?

  • मेट्रो, रेल्वे
  • सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंदच राहणार
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम
  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहणार, तर ऑनलाईन/दूरशिक्षणाला परवानगी
  • दुकानांमध्ये एकाच वेळी पाच जणांना प्रवेश, यावेळी सोशल डिस्टन्सचं पालन करणे अनिवार्य

नाईट कर्फ्यूदरम्यान कोणाला सूट?

– देशभरात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास सक्त मनाई. अत्यावश्यक सेवांचा अपवाद असेल. याबाबत अधिकच्या सूचना आणि नियम स्थानिक प्रशासनाकडून घोषित केल्या जातील.

– मर्यादित संख्येने स्थानिक विमानांना उड्डाण करण्याची आणि प्रवासी गाड्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

– औद्योगिक यूनिट्स, राष्ट्रीय आणि प्रादेशिक महामार्गांवर माल वाहतूक करणारी वाहनं, बस, गाड्यांना रात्री प्रवासाची मुभा असेल.

– ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत मर्यादित संख्येने आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

– राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यासाठी आणि वस्तूंची ने-आण करण्यासही सूट देण्यात आली आहे. यासाठी ई-पासची गरज लागणार नाही.

हेही वाचा : Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

देशातील प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाबतचे निर्णय संबंधित राज्य ठरवणार आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या अधिक सूचना स्थानिक प्रशासन गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जाहीर करेल. कोणता भाग कंटेनमेंट झोन असेल याबाबत देखील स्थानिक प्रशासनच परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेईल.

कंटेनमेंट झोनबाहेर जर कुठे कोरोना रुग्ण आढळला, तर त्याला बफर झोन बनवून त्याबाबत जिल्हा प्रशासन योग्य तो निर्णय घेईल.

केंद्र सरकराने या नव्या गाईडलाईन्स राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सूचनेनुसार तयार केल्या आहेत. तसेच, संबंधित मंत्रालय आणि विभागांशीही याबाबतची चर्चा करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

नाशिक शहरात पुन्हा संचारबंदी, संध्याकाळी सातनंतर बाहेर पडल्यास कारवाई

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

औरंगाबाद MIDC मध्ये 8 दिवसांचा कर्फ्यू, गरज पडल्यास शहरातही निर्णय

लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

(Unlock Phase Two begins Nationwide)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें