4 सेकंदात 7 बूट हाणले, मोदींच्या खासदाराने योगींच्या आमदाराला का धुतलं?

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार आणि आमदारामधील फाईटिंगने देशभरात खळबळ उडवून दिली. संतकबीरनगरमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यामध्ये भाजपचे खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली. खासदार त्रिपाठींनी आमदार राकेश सिंह यांना बुटाने हाणलं.  विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं. खासदार शरद […]

4 सेकंदात 7 बूट हाणले, मोदींच्या खासदाराने योगींच्या आमदाराला का धुतलं?
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:19 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार आणि आमदारामधील फाईटिंगने देशभरात खळबळ उडवून दिली. संतकबीरनगरमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यामध्ये भाजपचे खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली. खासदार त्रिपाठींनी आमदार राकेश सिंह यांना बुटाने हाणलं.  विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं.

खासदार शरद त्रिपाठी यांनी अवघ्या 4 सेकंदात तब्बल 7 वेळा आमदार राकेश सिंह यांना बुटाने मारलं. केंद्रातील नरेंद्र मोदी  आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार दोन्ही भाजपचेच. पण मेरा बूथ सबसे मजबूत याऐवजी आता मेरा बूट सबसे मजबूत अशी म्हण उत्तर प्रदेशात ऐकायला येत आहे.


संबंधित बातम्या 

नाव लिहिण्यावरुन वाद, भाजप खासदाराने आमदाराला बुटाने झोडपलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें