US Election LIVE Updates: बायडन यांच्या ‘निवडणूक घोटाळ्याविरुद्ध’ कायदेशीर लढाई लढू : डोनाल्ड ट्रम्प

US Election LIVE Updates: बायडन यांच्या 'निवडणूक घोटाळ्याविरुद्ध' कायदेशीर लढाई लढू : डोनाल्ड ट्रम्प
मतदान पार पडल्यानंतर अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये मतमोजणी पार पडत आहे. याचदरम्यान दोन्ही नेत्यांनी विजय आपलाच होणार, असा दावा केलाय.

अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मतमोजणी सुरु होऊन एक दिवसापेक्षा अधिक वेळ झाला आहे, तरीदेखील अंतिम निकाल समोर आलेले नाहीत.

अक्षय चोरगे

|

Nov 06, 2020 | 8:41 AM

अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या (US Presidential Election 2020) अंतिम निकालाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मतमोजणी सुरु होऊन एक दिवसापेक्षा अधिक वेळ झाला आहे, तरीदेखील अंतिम निकाल समोर आलेले नाहीत. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे, तर बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. (US Election Live Result Update)

[svt-event title=”ट्रम्प यांच्याविरोधात 19 माजी अटॉर्नी” date=”06/11/2020,8:40AM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेत 19 माजी अटॉर्नींच्या ग्रुपने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी ट्रम्प यांचा ‘इलेक्शन फ्रॉड’बाबतचा दावा निराधार असल्याचं म्हटलं आहे. या सर्व अटॉर्नींनी मागील रिपब्लिकन सरकारच्या काळात काम केलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”ट्रम्प कायदेशीर लढाई देणार” date=”06/11/2020,7:00AM” class=”svt-cd-green” ] डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, “बायडन यांनी दावा केलेल्या सर्व राज्यांमध्ये आम्ही ‘वोटर फ्रॉड’ आणि ‘स्टेट इलेक्शन फ्रॉड’ (निवडणूक घोटाळा) केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढणार आहोत. आम्हीच जिंकणार आहोत”.

[/svt-event]

[svt-event title=”ट्रम्प यांच्याकडून मतमोजणी थांबवण्याची मागणी” date=”06/11/2020,7:01AM” class=”svt-cd-green” ] जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. बहुमत मिळवण्यासाठी त्यांना आता केवळ सहा मतांची (इलेक्टोरल व्होट) आवश्यकता आहे. यादरम्यान रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे.

[/svt-event]

[svt-event title=”प्रत्येक मत मोजलं पहीजे : जो बायडन” date=”06/11/2020,7:05AM” class=”svt-cd-green” ] डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘प्रत्येक मत मोजलं गेलं पाहीजे’.

[/svt-event]

दरम्यान, या निवडणुकीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. जो बायडन यांनी जोरदार मुसंडी मारत विस्कॉन्सिन, मिशिगन या राज्यांमध्ये विजय मिळवला. नेवादा या स्विंग स्टेटमध्ये त्यांना 6 मतं मिळाल्यास ते विजयी होऊ शकतात. नेवादामधून बायडन आघाडीवर आहेत.

कांटे की टक्कर

पेन्सिल्वेनिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. दोन्ही रांज्यांमध्ये मिळून 35 इलेक्ट्रोल व्होटस आहेत. जॉर्जियामध्ये बायडन आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. इथेही ट्रम्प आघाडीवर आहेत. पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जिया मधील सर्व मतं मिळाली तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊ शकतो. त्यांना नेवादामधील 6 मतं मिळवण्याची गरज आहे. नेवादामध्ये मात्र बायडन आघाडीवर आहेत.

विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला होता.

बायडन यांचा विजयाचा दावा

दोन दिवसांनतरही लाखो मतांची मोजणी सुरु आहे. बायडन यांना 7.1 कोटी मतं मिळाली आहेत. बायडन यांना मिळालेली मतं इतिहासातील सर्वाधिक आहेत. बुधवारी बायडन यांनी विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

फेसबूक ट्विटरचा ट्रम्प यांना दणका

ट्रम्प यांनी फेसबुक पोस्टमध्ये ‘आपण मोठ्या संख्येने आहोत. पण विरोधक निवडणुकीचे निकाल प्रभावित करु पाहत आहेत. आपण त्यांना असे करु देणार नाही.’ असं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी ही पोस्ट करताच फेसबुकने त्यांना चांगलाच झटका दिला आहे. फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टवर लेबल लावले आहे. यामध्ये ‘निकालाचे निष्कर्ष सुरुवातीच्या मतमोजणीपेक्षा वेगळे असू शकतात. बॅलेटमार्फत मतदान केलेल्या मतांची मोजणी अजूनही सुरु आहे. त्यासाठी किमान काही आठवडेही लागू शकतात,’ असं फेसबुकने सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरही अशाच आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर ट्विटरनेदेखील त्यांच्या ट्वीटला लेबल लावत ट्वीटमधील काही दावा विवादित असू शकतो, असं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

US Election 2020 LIVE : मराठमोळे श्री ठाणेदार अमेरिकेत आमदारपदी, 93 टक्के मतांसह विरोधकांचा धुव्वा

US Election 2020 Live Update: अमेरिकेत निकालापूर्वी हिंसाचाराच्या घटना, हजारो आंदोलक रस्त्यांवर

US Election 2020 : मी राष्ट्रध्यक्षपदाचं कर्तव्य नक्की पूर्ण करेन, अंतिम निकालाआधीच जो बायडन यांचा विजयी नारा

America election result 2020 live

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें