अमेरिकेचा मॉर्डना कंपनीसोबत आणखी एक करार, 10 कोटी कोरोना लसीची खरेदी

अमेरिका मॉडर्ना कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या लसीचे 10 कोटी डोस खरेदी करणार आहे. (US Government Corona Vaccine deal with moderna company)

अमेरिकेचा मॉर्डना कंपनीसोबत आणखी एक करार, 10 कोटी कोरोना लसीची खरेदी
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 12:38 PM

न्यूयॉर्क : गेल्या 8-10 महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणूचं थैमान सुरु आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 57 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी अमेरिकेकडून सर्वच प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका मॉडर्ना कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे 10 कोटी डोस खरेदी करणार आहे. (US Government Corona Vaccine deal with moderna company)

मॉर्डन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील सरकारने कोरोना लसीचे 10 कोटी अतिरिक्त लस खरेदी करणार आहे. यासाठी सरकारकडून 1.65 बिलियन डॉलरचा करार केला आहे. याआधी अमेरिका सरकारने ऑगस्ट महिन्यात मॉर्डन कंपनीसोबत 10 कोटी डोस तयार करण्याचा करार केला होता. त्यासाठी 1.5 बिलियन अमेरिकी डॉलरचा करार केला होता.

यानुसार आतापर्यंत अमेरिकेकडून मॉर्डन कंपनीच्या कोरोना लसीच्या 20 कोटी डोसच्या खरेदीसाठी करार केला आहे. याद्वारे अमेरिका देशातील 10 कोटी जनतेला कोरोना लसीचे दोन डोस देऊ शकणार आहे. दरम्यान मॉर्डन कंपनीद्वारे अमेरिकेला ही नवी ऑर्डर 2021 पर्यंत दिली जाईल.

अमेरिकेत अशाप्रकारे होणार लसीकरण

या करारनंतर अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला जून 2021 पर्यंत मॉर्डन कंपनीकडून अतिरिक्त 10 कोटी कोरोना लसीचे डोस मिळतील. ज्यामुळे अमेरिकेतील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाईल. तसेच अमेरिकेतील सरकारने सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. ज्याद्वारे देशभरातील जनतेला कोरोना लस दिली जाईल.

दरम्यान नुकतंच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फायझर-बायोटेक कोविड -19 या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. एफडीए पॅनेलमध्ये लस सल्लागार, वैज्ञानिक, संसर्गजन्य रोग डॉक्टर आणि तज्ञांचा समावेश होता. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर आपत्कालीन परिस्थिती वापरावी असं या पॅनलमध्ये ठरवण्यात आलं आहे. खरंतर, अमेरिकेत बुधवारी कोरोनामुळे तीन हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता लस मंजूर झाल्यानंतर, देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रित येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मॉडर्ना या कंपनीने अमेरिकेसोबतच युरोपियन संघ, ब्रिटेन, जापान, कॅनडा, स्वित्झरलँड, इझ्राईल या देशांसोबत ही करार केला आहे. त्यामुळे यंदा मॉर्डन कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.(US Government Corona Vaccine deal with moderna company)

संबंधित बातम्या : 

Breaking : अमेरिकेतही फायझर लसीच्या आपत्कालीन वापरास मंजूरी

Covid-19 Vaccine | कोरोनाची लस दिली आणि रुग्ण HIV पॉझिटिव्ह झाले…!

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.