मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती दारुच्या नशेत बंदूक हवेत दाखवत दहशत पसरवत असल्याची सूचना त्यांना मिळाली होती.

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली

लखनौ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा येथे शुक्रवारी एका व्यक्तीने कुऱ्हाडीने आपल्याच (Father Killed Daughter) मुलीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे (Father Killed Daughter).

मोदहा येथील कुम्हरौडा मोहल्ला येथील तिंदुही रोड येथे ही घटना घडली. येथे शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता मिस्त्रीचं काम करणाऱ्या रमेश प्रजापतीने दारुच्या नशेत कुऱ्हाडीने हल्ला करत मुलगी अनिताची (वय 22) हत्या केली आणि त्यानंतर बंदूक हातात दाखवत परिसरात दहशतही माजवली, अशी माहिती हमीरपूरचे पोलीस अधिक्षक नरेंद्र कुमार सिंह यांनी दिली.

पोलिसांसमोर शरणागती पत्करली

मुलीच्या गळ्यावर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती दारुच्या नशेत बंदूक हवेत दाखवत दहशत पसरवत असल्याची सूचना त्यांना मिळाली होती. त्यानंतर काही वेळाने आणखी एक माहिती मिळाली की रमेश यांच्या मुलीचा मृतदेह घरात पडला आहे. तिची हत्या करण्यात आली आहे

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जावून रमेशला अटक केलं. तपासात त्यानेच कुऱ्हाडीने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याला कुऱ्हाडी, बंदूक आणि चाकूसह अटक करण्यात आली (Father Killed Daughter).

बापाविरोधात गुन्हा दाखल

ही घटना घडली तेव्हा मुलीची आई बिट्टन ही शेतात कामाला गेली होती आणि तिचा लहान भाऊ सुनिल हा गुरं चरायला होता. त्यामुळे घरी मुलगी आणि वडील हे दोघेच होते. रमेशने अनितावर कुऱ्हाडीने वार केले. तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर वार केले, त्यानंतर अनिता धारातीर्थी पडली. अनिताची हत्या केल्यानंतर रमेश त्याच्या शेजारीच्या घरी गेल्या आणि त्याला सांगितलं की कोणीतरी त्याच्या मुलीची हत्या केली. जेव्हा शेजारी त्याच्या घरी बघायला गेला तेव्हा रमेशने त्याला बंदुकीचा धाक दैाखवत बांधायचा प्रयत्न केला. मात्र, कसाबसा शेजारी तेथून स्वत:ला वाचवून तेथून पळाला, असं पोलीस अधीक्षक म्हणाले.

त्यानंतर त्याने पोलिसांना याची सूचना दिली. याप्रकरणी रमेशविरोधात त्याच्या सासऱ्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Father Killed Daughter

संबंधित बातम्या :

हत्या, बलात्काराच्या आरोपात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा 75 वर्षीय वृद्धेवर बलात्कार, नराधमाला बेड्या

केवळ चार हजार रुपयांसाठी मित्राची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला, दोघांना अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI