Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रकृती खालावल्यामुळे काल (बुधवारी) कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं (Actor Rishi Kapoor passed away)

Rishi Kapoor | बॉलिवूडचा 'चॉकलेट हिरो' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 10:46 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी बिरुदावली मिरवणारे, कपूर खानदानाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आणि सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गुरुवारी सकाळी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी दिली. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. (Actor Rishi Kapoor passed away)

ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रकृती खालावल्यामुळे काल (बुधवारी) कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात अभिनेत्री-पत्नी नीतू सिंग, अभिनेता-मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर, ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर असा परिवार आहे.

ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याच्या निधनानंतर 24 तासातच ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आल्याने बॉलिवूडसह चाहत्यांवरही शोककळा पसरली आहे.

ऋषी कपूर यांचा परिचय

ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये  झाला होता. त्यांचे खरे नाव ऋषीराज कपूर. ऋषी कपूर हे द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे नातू. मुंबईतील चॅम्पियन स्कूलमध्ये ऋषी कपूर यांचं शिक्षण झालं. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते कपूर कुटुंबासह चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते.

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 1973 मध्ये  प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

ऋषी कपूर यांनी जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत गाजवला होता.  2008 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. (Actor Rishi Kapoor passed away)

ऋषी कपूर यांनी भूमिका साकारलेले लैला मजनू, रफूचक्कर, सरगम, कर्ज, प्रेम रोग, नगिना, हनिमून, चांदनी, हीना, खेल खेल में, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही, बदलते रिश्ते, सागर, बोल राधा बोल, दामिनी, दिवाना असे एकापेक्षा एक चित्रपट गाजले आहेत.

अभिनेत्री नीतू सिंगबरोबर 1980 मध्ये ते विवाहबद्ध झाले. पत्‍नी नीतू सिंगसोबत ऋषी कपूर यांची पडद्यावरील जोडी लोकप्रिय ठरली होती. दोघांनी लग्नापूर्वी जवळपास 12 सिनेमात एकत्र काम केलं होतं. 2010 मध्ये लग्नानंतर प्रथमच त्यांनी ‘दो दुनी चार’ सिनेमात एकत्र काम केलं.

ये हे जलवा, हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव आज कल, पटियाला हाऊस यासारख्या चित्रपटात त्यांनी सहकलाकार म्हणून काम केले. हाऊसफुल 2 या चित्रपटात त्यांनी भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबत काम केलं. ‘खजाना’ या चित्रपटानंतर हा दोन्ही भावांचा एकमेव चित्रपट होता.

1999 मध्ये त्यांनी ‘आ अब लौट चले’ हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात राजेश खन्ना, ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना यासारखी तगडी स्टारकास्ट होती. ‘कुछ तो है’ या सिनेमात ऋषी कपूर यांनी साकारलेला ‘सायको किलर’ चांगलाच गाजला. त्यानंतर हृतिक रोशनसोबत अग्निपथ चित्रपटात त्यांनी रंगवलेला ‘रौफ लाला’ हा खलनायक भाव खाऊन गेला होता.

ऋषी कपूर यांच्यासाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक दिग्गज गायकांनी गाणी गायली. विशेष म्हणजे ही सर्वच गाणी चांगलीच गाजली. ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या नावाने लिहिलेले आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. दोन वर्षांपूर्वी, 102 नॉट आऊट या चित्रपटात त्यांनी साकारलेली वृद्धाची भूमिका लोकप्रिय ठरली होती. 2019 मध्ये ‘द बॉडी’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला.

कर्करोगाचं निदान

2018 मध्ये कर्करोगाचं निदान झाल्यानंतर ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी नीतू सिंग-रणबीर कपूरसोबतच आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पदुकोन, करण जोहर आणि मलायका अरोरा असे अनेक कलाकार त्यांना भेटून गेले होते. उपचाराअंती जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर ऋषी कपूर सप्टेंबर 2019 मध्ये मायदेशी परत आले होते.

‘मला आता बरं वाटतंय आणि मी कोणतंही काम करु शकतो. पुन्हा अभिनय सुरु करण्याचा विचार आहे. प्रेक्षकांना आता माझं काम आवडेल की नाही, हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्‍याचदा रक्त देण्यात आलं. तेव्हा मी नीतूला म्हणायचो – मला आशा आहे, नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही” अशी प्रतिक्रिया ऋषी कपूर यांनी सप्टेंबर 2019 मध्ये दिली होती.

ऋषी कपूर यांनी चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अभिनेत्री जुही चावलासोबत ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमाचं चित्रीकरण त्यांनी सुरु केलं होतं. मात्र त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरीच राहणार आहे.

(Actor Rishi Kapoor passed away)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.