“लागिरं…”तील जीजी अनंतात विलीन, कराडमध्ये अभिनेत्री कमल ठोकेंना साश्रू नयनांनी निरोप

मराठी चित्रपट सृष्टीत त्या ''जीजी'' म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील 'लागिर झालं जी' (Lagir Zhala Ji) या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या.

लागिरं...तील जीजी अनंतात विलीन, कराडमध्ये अभिनेत्री कमल ठोकेंना साश्रू नयनांनी निरोप
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 3:50 PM

कराड : ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके (वय 74 ) (veteran actress Kamal Thoke) यांचे काल सायंकाळी बंगलुरू इथं निधन झालं. मराठी चित्रपट सृष्टीत त्या ”जीजी” म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिर झालं जी’ (Lagir Zhala Ji) या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Veteran actress Kamal Thoke funeral in Karad)

मिळालेल्या माहितीनुसार, कमल ठोके हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. बंगळुरू इथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर 14 नोव्हेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरंतर, कमल यांचा अभिनयातील प्रवासही मोठा होता. 1992 मध्ये त्यांनी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बरं इतकंच नाही, यावेळी त्या कराडमध्ये शिक्षिकादेखील होत्या.

कमल ठोके यांच्यावर बंगळुरू इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काल सायंकाळी त्यांचं निधन झालं. श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षिकेची नोकरी सांभाळत अभिनय जागृत ठेवला. नाटक, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही काम केलं. सासर माहेर, सखा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.

शिक्षकाच्या निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनयाची सेवा केली. अल्पावधित प्रसिद्धीचे शिखर पार करणारी झी मराठीची ”लागिर झालं जी” या मालिकेतून त्या घरा-घरात ”जीजी” या नावाने परिचित झाल्या आणि नावलौकिक मिळवला. श्रीमती ठोके यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज कराडला त्यांच्या मंगळवार पेठ कमळेश्वर मंदिर इथल्या निवासस्थानी आणण्यात आलं.

या ठिकाणी मान्यवरांसह चित्रपट, नाट्य सृष्टीतील लोकांनी अंतिम दर्शन घेऊन अभिवादन केलं. यानंतर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सुनिल यांने त्यांना मुखाग्नी दिली. सगळ्यांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

इतर बातम्या – 

Riteish Deshmukh | आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते, रितेश देशमुखची खास दिवाळी

Ranu Mandal | रानू मंडलला आणखी एक संधी, ‘सरोजिनी’ बायोपिकमध्ये गाणे गाणार!

(Veteran actress Kamal Thoke funeral in Karad)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.