Ranu Mandal | रानू मंडलला आणखी एक संधी, ‘सरोजिनी’ बायोपिकमध्ये गाणे गाणार!

टीव्ही सीरियल रामायणात सीतेची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकणारी दीपिका चिखलिया बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे.

Ranu Mandal | रानू मंडलला आणखी एक संधी, ‘सरोजिनी’ बायोपिकमध्ये गाणे गाणार!

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडलला (Ranu Mandal) चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, यानंतर त्यांच्या काही वागणुकीमुळे पुढे त्यांना काम मिळेनासे झाले होते. अशातच त्यांच्या मदतीला रामायणातील ‘सीता’ अर्थात अभिनेत्री दीपिका चिखलिया धावून आली आहे. लॉकडाऊन काळात हालाखीची परिस्थिती ओढवलेल्या रानू मंडल यांना दीपिकाने त्यांच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे (Ranu Mandal will sing a song for Dipika Chikhlia next movie Sarojini).

टीव्ही सीरियल रामायणात सीतेची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकणारी दीपिका चिखलिया बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. सरोजिनी नायडू यांचा बायोपिक ‘सरोजिनी’मध्ये त्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दीपिका चिखलियाच्या या चित्रपटामुळे सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल यांचे नशिब पुन्हा एकदा चमकणार आहे. दीपिकाच्या या चित्रपटात रानू मंडल गाणे गाणार आहे.

दीपिका चिखलिया यांची ट्विट करत माहिती

या संदर्भातली माहिती स्वतः दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. धीरज मिश्रा यांनी लिहिलेले ‘सरोजिनी’ या चित्रपटाचे हे गाणे रानू मंडल यांच्या आवाजात रेकॉर्ड केले जाणार आहे. तसेच, दीपिका यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रानू मंडल धीरज मिश्रासोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीमध्ये रानू मंडल यांनी गाण्याच्या काही ओळी गात, तुम्ही मला जे प्रेम आणि आदर आधी दिला. तसेच, यावेळीही द्याल, अशी आशा’, असे म्हटले आहे (Ranu Mandal will sing a song for Dipika Chikhlia next movie Sarojini).

रातोरात मिळाली प्रसिद्धी

रानू मंडल यांचा पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवरील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामान्यांसह बॉलिवूडमधील गायक आणि संगीतकार यांनी रानूचे कौतुक केले होते. एकूणच काय रानू मंडल यांच्या मधूर आवाजाने साऱ्यांनाच चांगलीच भूरळ घातली होती.

या व्हायरल व्हिडीओनंतर गायक हिमेश रेशमियाने रानू मंडल यांना त्यांच्या आगामी चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली होती. रानू यांचे पहिले गाणे ‘तेरी मेरी कहाणी’ प्रदर्शित झाल्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली आहे. हिमेश रेशमिया (Himesh Reshmiya)  यांच्यासोबत गायलेले हे गाणे सुपरडुपर हिट ठरले होते.

(Ranu Mandal will sing a song for Dipika Chikhlia next movie Sarojini)