AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Flood LIVE | पूरस्थितीतही पावसाचा जोर वाढताच, पुण्यातील एनडीआरएफच्या 4 तुकड्या विदर्भाकडे रवाना

विदर्भात पूरपरिस्थितीत देखील पावसाचा जोर वाढताच आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरफच्या 4 तुकड्या पुण्यातून विदर्भाकडे रवाना करण्यात आल्या आहेत (Vidarbha Flood Latest Update).

Vidarbha Flood LIVE | पूरस्थितीतही पावसाचा जोर वाढताच, पुण्यातील एनडीआरएफच्या 4 तुकड्या विदर्भाकडे रवाना
| Updated on: Aug 31, 2020 | 6:40 PM
Share

नागपूर : विदर्भात पूरपरिस्थितीत देखील पावसाचा जोर वाढताच आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरफच्या 4 तुकड्या पुण्यातून विदर्भाकडे रवाना करण्यात आल्या आहेत (Vidarbha Flood Latest Update). या तुकड्यांची विदर्भातील नागपूर ,चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यात तैनाती केली जाणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर वाढल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

LIVE Updates:

  • राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची बोट, वाहन आणि हेलिकॉप्टरव्दारे पाहणी, कोकणाप्रमाणेच भरीव आणि वाढीव मदत देण्याचं वडेट्टीवारांचं आश्वासन, तातडीने सर्वे करुन पंचनामे करणार, विजय वडेट्टीवार यांचे संबधित अधिकाऱ्यांना आदेश
  • गोसेखुर्द प्रकल्पाच्या विसर्गामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील तब्बल 13 गावांना पुराने वेढलं, हजारो एकर भाताची शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचे पाळीव जनावरेही वाहून गेली, मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान
  • गोसेखुर्द धरणाच्या प्रचंड विसर्गाने पुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खाद्य पाकिटे टाकणार, सुमारे 15 हून अधिक बाधित गावांमध्ये पुराची स्थिती बिकट, मांगली गावाचा 24 तासापासून संपर्क नाही, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात, सध्या 30800 वरुन 26 हजार क्यूसेकपर्यंत खाली विसर्ग कमी, बाधित गावातील स्थिती निवळण्यास आणखी 24 तास लागणार
  • नागपूर ,चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करणार
  • पुण्यातील एनडीआरएफच्या 4 तुकड्या विदर्भाकडे रवाना

विदर्भातील पावसाचा वाढता जोर बघता येथील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असलेल्या एनडीआरएफच्या चार तुकड्या पुण्यातून विदर्भात रवाना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन या चारही तुकड्या पुणे विमानतळावरुन तातडीने रवाना करण्यात आल्या आहेत. काही वेळातच या टीम पूरपरिस्थितीत आपलं मदतकार्य सुरु करणार आहेत.

गोसीखुद धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने धरणातून 30257 पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगज, अहेरी सिरोंचा या चार तालुक्यांना अलर्ट देण्यात आला आहे. या भागात हजारो हेक्टर शेतीला पुराचा फटका बसला आहे. रात्रीपासून आतापर्यंत 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

गडचिरोली जिल्ह्याला तिसरऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. 10 दिवसांपूर्वी आलेल्या पुराचे आतापर्यंत पंचनामे सुध्दा करण्यात आले नाही, तोच आता पुन्हा एकदा गडचिरोलीला पुराने वेढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विदर्भाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील जवळपास 10 मार्ग बंद झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Gosekhurd Dam | गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग, नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीत पूर, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती

Vidarbha Flood | चंद्रपुरातील लाडज गाव महापुराच्या विळख्यात, 1200 ग्रामस्थ रात्रभर पुराच्या छायेत

संबंधित व्हिडीओ :

Vidarbha Flood Latest Update

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.