AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेटप्रमाणेच बँकांनी मलाही मदत करायला हवी होती : विजय मल्ल्या

मुंबई : भारतीय बँकांनी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशातून पळालेल्या विजय मल्ल्याने जेट एअरवेजच्या मदत पॅकेजवरुन सरकारला घेरलं. त्याने एनडीए सरकार आणि सरकारी बँकांवर दुजाभाव करण्याचा आरोप लावला. आर्थिक अडचणीत अडकलेल्या जेट एअरवेजला वाचवण्यासाठी भारतीय स्टेट बँक कंपनीची मदत करत आहे. त्यावर आक्षेप घेत मल्ल्याने ट्विटरवरुन सरकारवर आणि बँकेवर अनेक आरोप केले. […]

जेटप्रमाणेच बँकांनी मलाही मदत करायला हवी होती : विजय मल्ल्या
विजय माल्ल्या
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : भारतीय बँकांनी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशातून पळालेल्या विजय मल्ल्याने जेट एअरवेजच्या मदत पॅकेजवरुन सरकारला घेरलं. त्याने एनडीए सरकार आणि सरकारी बँकांवर दुजाभाव करण्याचा आरोप लावला. आर्थिक अडचणीत अडकलेल्या जेट एअरवेजला वाचवण्यासाठी भारतीय स्टेट बँक कंपनीची मदत करत आहे. त्यावर आक्षेप घेत मल्ल्याने ट्विटरवरुन सरकारवर आणि बँकेवर अनेक आरोप केले. “किंगफिशरसाठीही असं व्हावं अशी माझी इच्छा होती.”

“सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नोकरी, संपर्क सुविधा आणि कंपनीला वाचवण्यासाठी जेट एअरवेजला मदतीचा हात दिला, हे बघून आनंद झाला”, असं मल्ल्या त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.

“याच बँकांनी देशातील सर्वोत्तम एअरलाईन्सबाबत असं केलं नाही, तिला बर्बाद होण्यासाठी सोडून दिलं. एनडीए सरकारचा हा दुजाभाव आहे”, किंगफिशर आणि जेट या कंपन्यांमध्ये दुजाभाव केल्याचा आरोप मल्ल्याने भाजप सरकारवर लावला. तर त्याने किंगफिशरला वाचवण्यासाठी चार हजार कोटी रुपये गुंतवल्याचंही सांगितलं.

“भाजपच्या प्रवक्त्यांनी मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवलेल्या पत्रांच्या आधारे बँकांनी अवैध पद्धतीने किंगफिशरची मदत केल्याचा आरोप केला”, असेही मल्ल्या म्हणाला. तसेच, “मी पुन्हा सांगतो की, मी बँक आणि इतर कर्जदारांचं कर्ज फेडण्यासाठी माननीय कर्नाटक उच्च न्यायालयात चल संपत्ती ठेवणयाचा प्रस्ताव दिला. तो पैसा बँक का घेत नाही. यामुळे आणखी काही नाही तर जेट एअरवेजला वाचवण्यात मदत होईल”, असेही तो म्हणाला.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.