सोशल मीडियावर ‘या’ फोटोमुळे लोकांना फुटला घाम!, तुम्हाला कळलं का सत्य?

सोशल मीडियावर 'या' फोटोमुळे लोकांना फुटला घाम!, तुम्हाला कळलं का सत्य?

तुम्ही पाहताय हा फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटला तर काही नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट्स करून टिंगल उडवली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Feb 03, 2021 | 1:33 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत इंटरनेटच्या अतिवापरामुळे ऑनलाईन क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. तसं पाहिला गेलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण काहीही करू शकतो. आधुनिकतेमुळे आता सर्व अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण याचा अनेकजण गैरवापर करताना दिसतात. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक बातम्याही व्हायरल होत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. (Viral photo of couple standing on cliff edge gone viral on social media)

तुम्ही पाहताय हा फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटला तर काही नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट्स करून टिंगल उडवली आहे. खरंतर, हा फोटो पाहून लोक गोंधळात पडले आहेत की हा फोटो खरा आहे की खोटा? कारण, ज्यापद्धतीने या जोडप्याने फोटोशूट केलं आहे ते अगदी धोकादायक आहे. त्यामुळे अनेक नेटकरी यावर चिडलेही आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो तुर्कीच्या गुलेक महलमध्ये क्लीक करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एक मुलगा कड्यावरून पडताना दाखवला आहे तर एक मुलगी डोंगराच्या कड्यावर उभी राहून त्याला हात देत आहे. हा फोटो असा की पहिल्यांदा पाहणारा नक्कीच घाबरेल. सोशल मीडियावर @sredits नावाच्या एका यूजरने हा व्हीडीओ शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करताना यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘काय हे करण्यापासून तुम्हाला कोणी रोकत आहे?’ या फोटोला पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे तर अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. त्यावर नेटकरीही काय प्रतिक्रिया देतील सांगता येत नाही. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला उत्तम म्हटलं आहे. तर काहींनी हा फोटो खोटा असून फोटोशॉप केलं असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral photo of couple standing on cliff edge gone viral on social media)

संबंधित बातम्या –

तुला कापू का विचारल्यावर कोंबडी चक्क नको म्हणाली, VIRAL व्हीडिओ पाहून पोट धरून हसाल

मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

जगातल्या सर्वात मोठ्या हुकूमशहाच्या टॉयलेट सीटचा होणार लिलाव, किंमत वाचून हैराण व्हाल

(Viral photo of couple standing on cliff edge gone viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें