नवी मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ, एकच फोटो तीन ठिकाणी, गावात नसलेल्यांची नावं यादीत

निवडणूक आयोगाकडून मतदारांची नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात (Voting list scam navi mumbai) आली.

नवी मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ, एकच फोटो तीन ठिकाणी, गावात नसलेल्यांची नावं यादीत
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 8:09 AM

नवी मुंबई : निवडणूक आयोगाकडून मतदारांची नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात (Voting list scam navi mumbai) आली. परंतु या सुविधेचा लाभ बोगस मतदार नोंदणी करवून घेण्यासाठी होत असल्याचे आढळले आहे. 151 बेलापूर मतदारसंघात असलेल्या कुकशेत गावात अशा शेकडो बोगस आणि दुबार मतदारांची यादी समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक भाजपचे कार्यकर्ते मकरांत म्हात्रे यांनी निवडणूक अधिकारी, नवी मुंबई पालिका आयुक्त आणि विभाग अधिकारी यांना निवेदन देऊन या यादीवर असलेली बोगस नावे त्वरित काढण्यात यावी अशी विनंती (Voting list scam navi mumbai) केली आहे.

बोगस आणि दुबार नावं असलेल्या नवी मुंबई शहरातील मतदार याद्या काही प्रमाणात ओसरल्या असल्या तरी याद्यांमधील सावळा गोंधळ अद्यापपर्यंत थांबलेला नाही. अनेक याद्यांमध्ये महिला मतदाराच्या नावाच्या पुढे विद्यार्थीनीचे फोटा लावण्यात आले असून एकाच यादीत एका मतदाराचे छायाचित्र तीन-तीन नावांच्या पुढे पहायला मिळत आहे. गोलमाल असलेल्या या मतदार याद्या दरुस्त होणार की तशाच राहणार या चिंतेने इच्छुक उमेदवारांना ग्रासले आहे. सर्वांचे लक्ष आता येत्या 9 मार्च रोजी प्रधिध्द होणाऱ्या मतदार यादीकडे लागले आहे.

महापालिका किंवा विधानसभेचे निवडणूक आली की नवी मुंबई शहरात मतदार याद्या पुरवण्याचे काम पूर्वी जोरात सुरू व्हायचे. मुरबाड, जुन्नर, आंबेगाव, आंध्र प्रदेशातील नागरिकांची नावेही येथील मतदार यादीमध्ये आढळून यायचे.यापूर्वी शिवसेनेतर्फे आवाज उठवल्यामुळे बेलापूर मतदार संघातील सुमारे 25 हजार दुबार आणि बोगस नावे कमी करण्यात आली.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील यादी क्रमांक 212 मध्ये मतदार क्रमांक 510 वर शितल सोळंकी यांचे नाव असून त्यांच्या पुढे चक्क एका विद्यार्थीनीचा फोटा टाकण्यात आला आहे. मतदार यादी क्रमांक 215 मध्ये मतदार क्रमांक 580 अक्षय सकपाळ, 582 ज्योती म्हात्रे, 597 सुरक्षा तिवारी या तिघांच्या पुढे एकच छायाचित्र टाकण्यात आलेले आहे. अशाच पध्दतीचा गोंधळ अनेक मतदार याद्यांमध्ये समोर आल्याने सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

23 मार्चला अंतिम यादी प्रसिध्द होणार

एप्रिल 2020 ला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रभागाच्या मतदार याद्या येत्या 9 मार्च रोजी प्रसिध्द होणार आहेत. त्यानंतर या याद्यांवर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यांची सुनावणी झाल्यानंतर येत्या 23 मार्च रोजी निवडणूक आयोग अंतिम मतदार यादी जाहीर करणार असून दुसऱ्या दिवशी मतदान केंद्राची यादी जाहीर होणार आहे. अंतिम मतदार याद्यांसाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांचा विचार केला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.