AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावित्री नदीसारखी दुर्घटना टळली, गाड्या गेल्या आणि पूल खचला

चेतन व्यास,टीव्ही 9 मराठी, वर्धा : वर्ध्यातील महाकाली मार्गावरील 52 वर्ष जुना पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा,कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर हा पूल आहे. रात्री 11 च्या सुमारास पुलाच्या मध्यभागातील पिलर खचला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनं निघून गेल्यानंतर हा […]

सावित्री नदीसारखी दुर्घटना टळली, गाड्या गेल्या आणि पूल खचला
| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM
Share

चेतन व्यास,टीव्ही 9 मराठी, वर्धा : वर्ध्यातील महाकाली मार्गावरील 52 वर्ष जुना पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा,कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर हा पूल आहे. रात्री 11 च्या सुमारास पुलाच्या मध्यभागातील पिलर खचला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनं निघून गेल्यानंतर हा पूल खचला.

याबाबतची माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या ठिकाणची वाहतूक तात्काळ थांबवली. हा पूल राज्य महामार्गावर असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो.

साधारण 1964 मध्ये पुलाची निर्मिती झाली आहे. 52 वर्षात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक झाली आहे. या मार्गाचा इतर मार्गाच्या तुलनेत मध्यप्रदेशमधून हैदराबादकडे जाण्यासाठी उपयोग होतो. या पुलामुळे जवळपास 100 किलोमीटरचा फेरा वाचतो. शिवाय टोल वाचवण्यासाठी या मार्गाचा उपयोग होते. महाकालीचे प्रसिद्ध देवस्थानसुद्धा या मार्गावर आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.