मे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच थांबा

उन्हाळा म्हटलं की सर्वाना आंब्याची आठवण येते. मात्र यंदा कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात (Wardha doctor awareness on corona) आलं आहे.

मे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत घरीच थांबा

वर्धा : उन्हाळा म्हटलं की सर्वाना आंब्याची आठवण येते. मात्र यंदा कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात (Wardha doctor awareness on corona) आलं आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहे. अशातच नागरिकांनी या लॉक डाऊनच्या काळात घरातच राहावे याकरिता प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शन केलं जात आहे. आष्टी तालुक्यातील साहूर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यासाठी एक भन्नाट आयडीया निवडली आहे. कर्मचारी नागरिकांना घरोघरी जात ‘ मे महिन्यात खायचा असेल आंबा तर लॉक डाऊन होईपर्यंत आपल्या घरीच थांबा’ असा संदेश देत आहेत. कोरोनाची गंभीरता सांगणारा हा संदेश धोक्याचे (Wardha doctor awareness on corona) संकेतही देत आहे.

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता घरा-घरात पोहचून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. अशाच प्रकारचे कार्य करणाऱ्या आष्टी तालुक्यातील साहूर येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेला खबरदारीचा संदेश दिला आहे.

देशात लॉक डाऊन आहे. या परिस्थितीत कुणी बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. खबरदारीच्या सूचना, आवाहन आणि आदेश देखील विविध स्तरातून दिले जात आहेत. अशात ग्रामीण भागातील आष्टी तालुक्यात असणाऱ्या साहूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मे महिन्यात दरवर्षी आस्वाद घेतल्या जाणाऱ्या आंब्याचीच आठवण महाराष्ट्रातील जनतेला करून दिली आहे. आंब्याची आठवण करून देत स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याचेच आवाहन करण्यात आले आहे. मे महिन्यात खायचा असेल आंबा तर सर्वांनी लॉक डाऊन असेपर्यंत घरीच थांबा! असे सांगणारा हा संदेश म्हणजे धोक्याचे संकेत सांगणारी ही घंटा आहे.

दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 21 दिवसांचा लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशात आतापर्तंय 860 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात 170 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI