AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus : पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालायची गरज नाही, लहान मुलांसाठी WHO च्या नवीन गाईडलाईन्स

जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्व आरोग्य संस्थेने (WHO) लहान मुलांबाबतची नियमावलीत सुधारणा केली आहे.

Corona Virus : पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालायची गरज नाही, लहान मुलांसाठी WHO च्या नवीन गाईडलाईन्स
संग्रहित छायाचित्र.
| Updated on: Aug 23, 2020 | 8:14 PM
Share

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे (WHO New Guidelines For Children). त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) लहान मुलांबाबतची नियमावलीत सुधारणा केली आहे. WHO नुसार, पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही. कमीतकमी मदतीने मास्क घालण्याची मुलांची क्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे (WHO New Guidelines For Children).

6 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी नियम काय?

WHO ने हा निर्णय घेताना इतरही अनेक गोष्टींचाही विचार केला, जसे की लहान मुलांची सुरक्षितता आणि आरोग्य. त्याशिवाय, 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांसाठी WHO ने वेगळे नियम बनवले आहेत. या वयोगटातील मुलं जर त्या क्षेत्रातून येत असतील जिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तरच त्यांना मास्क घालण्याची गरज आहे.

यामध्ये मुलांच्या मास्क घालण्याची क्षमता, मोठ्यांची काळजी आणि मास्क घालण्याच्या संभाव्य प्रभावांबद्दल विचार करण्यात आला आहे.

12 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी मास्क अनिवार्य

WHO नुसार, 12 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य असेल आणि प्रौढांसाठी सध्या असलेल्या गाईडलाईन्सच लागू असतील.

कॅन्सर रुग्णांनी मेडिकल मास्क घालावे

कॅन्सर आणि सिस्टिक फायब्रोसिसने ग्रस्त असलेल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मेडिकल मास्कचा करावा, असंही WHO ने सांगितलं. WHO नुसार, मास्क घालताना त्या मुलांना अडथळा येतो त्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य नसेल.

WHO New Guidelines For Children

संबंधित बातम्या :

Corona World News | रशियाची लस माकडांनाही देणार नाही, अमेरिकेने लसीची खिल्ली उडवली

कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजार लवकर होत नाहीत, संशोधकांचा दावा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.