अंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Aug 14, 2019 | 8:39 AM

मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना वसईत घडली. पतीचे पाय बांधून, अंगावर उकळतं तेल ओतलं, डोळ्यात मिरची पूड घातली त्यानंतर डोक्यावर हातोडीने वारही केला. पतीची हत्या करण्यासाठी या पत्नीने विकृतीची परिसीमा गाठली.

अंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला

वसई : मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना वसईत घडली. पतीचे पाय बांधून, अंगावर उकळतं तेल ओतलं, डोळ्यात मिरची पूड घातली त्यानंतर डोक्यावर हातोडीने वारही केला. पतीची हत्या करण्यासाठी या पत्नीने विकृतीची परिसीमा गाठली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पतीची प्रकृतू गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. तर ही क्रूर पत्नी आणि मित्र हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

वसई पश्चिमच्या उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास एक भयानक घटना घडली. या इमारतीत भविष्य भुरागोहाय हा त्याची पत्नी क्विन्सीया भुरागोहाय, दोन जुळी मुलं आणि मित्रासोबत राहत होता. मंगळवारी रात्री कौटुंबिक भांडणातून क्विन्सीयाने भविष्यला मारहाण केली, त्यानंतर त्याच्यावर उकळतं तेल ओतलं. यामध्ये भविष्य गंभीर जखमी झाला. मात्र, क्विन्सीया इतक्यावरच थांबली नाही. यानंतर तिने हातोडीने भविष्यच्या डोक्यावर वार केले. घरात मिळेल त्या वस्तूने ती भविष्यला मारहाण करत होती. त्यानंतर तिने मित्राच्या सहाय्याने त्याचे हात पाय बांधले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भविष्यने किचनच्या खिडकीतू प्रेशर कुकर आणि म्युझिक स्पीकर खाली फेकले. ते पाहून परिसरातील लोक जमा झाले आणि पोलिसांना तात्काळ याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा भविष्य हा अर्धनग्न अवस्थेत बाधरुममध्ये पडलेला होता. पोलिसांना जखमी जखमी भविष्यला तात्काळ जे.जे. रुग्णालयात उपचाारसाठी दाखल केलं. भविष्यची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर, क्विन्सीया भुरागोहाय आणि मित्राला अटक करण्यात आली आहे.

क्विन्सीया ही ख्रिश्चन होती, तर भविष्य हा मुळचा आसामचा रहिवासी होता. या दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. भविष्य हा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. तर त्याच्यासोबत राहणारा मित्र सतवीर हा वसईच्या दत्तानी मॉलमध्ये मेंहदी काढण्याचं काम करायचा. दोघांनीही वसईच्या उमेलमान परिसरातील प्रतापगड या सोसायटीमध्ये भाड्यानं रुम घेतला होता. क्विन्सीया आणि भविष्य यांच्यातील कौटुंबिक वादातू ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

VIDEO : 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI