Yashomati Thakur | सलोनी, ‘जिंकलंस लेकी’, मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली

मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुण्याच्या सलोनी सातपुतेसाठी काढलेल्या उद्गारांनी सलोनीच्या अश्रूंचा बांध फुटला.

Yashomati Thakur | सलोनी, 'जिंकलंस लेकी', मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली

पुणे : पुण्यात कोरोनाच्या दहशतीत एका तरुणीचा व्हिडीओ (Yashomati Thakur Called Saloni Satpute) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यामध्ये सलोनी सातपुते नावाची एक तरुणी तिची बहिण कोरोनावर मात करुन घरी आल्यानंतर चक्क रस्त्यावर उतरुन गाणं लावून मनमोकळेपणाने नाचते आणि आपला आनंद व्यक्त करते. सलोनीचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. कोरोना रुग्णांसाठी सलोनीने घेतलेल्या या पुढाकाराची दखल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील घेतली (Yashomati Thakur Called Saloni Satpute) आहे.

कोव्हिडशी सामना करुन परत आलेल्या बहिणीचं नाचून स्वागत करणाऱ्या सलोनीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. आपल्याला रोगाशी सामना करायचा आहे, रुग्णाशी नाही, हा संदेश देणाऱ्या सलोनीला भेटायची इच्छा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, यशोमती ठाकूर यांनी सलोनीचा नंबर शोधून काढून तिच्याशी संपर्क साधला. राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांकडून थेट फोन आल्यानंतर सलोनी भारावून गेली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुण्याच्या सलोनी सातपुतेसाठी काढलेल्या उद्गारांनी सलोनीच्या अश्रूंचा बांध फुटला.

यशोमती ठाकूर आणि सलोनी सातपुते यांच्यातील फोनवरुन झालेला संवाद…

यशोमती ठाकूर – हाय सलोनी, कशी आहेस तू?

सलोनी सातपुते – मी बरी आहे मॅम

यशोमती ठाकूर – तू खूप छान स्वागत केलसं आणि मी ते माझ्या फेसबुकवर देखील शेअर केलं.

सलोनी सातपुते – थँक यू मॅम… मी ती पोस्ट पाहिली आणि मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही, माझ्या डोळ्यात पाणीच आलं, तुम्ही ‘जिंकलंस लेकी’ असं टाकलं. ते पाहून मला भरुन आलं होतं, मला नाही कळत आहे की मला काय वाटतंय ते मी कसं सांगू…

यशोमती ठाकूर – छान.. त्याच्यामुळे समाजात एक खूप मोठा मेसेज गेला आणि आम्ही आता जातो, कोरोना झालेल्या, त्यातून बरे झालेल्या लोकांना भेटतो तेव्हा त्यांना स्वीकारणे हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आपल्यासमोर येतो. तू खूप मोठा संदेश दिला आहेस समाजाला, त्यासाठी थँक यू…

Yashomati Thakur Called Saloni Satpute

सलोनी सातपुते – थँक यू सो मच मॅम तुम्ही बोललात माझ्याशी… मला तुमचा वेळ दिला… खरंच मला याचा खूप आनंद आहे.

यशोमती ठाकूर – असंच कोम करत राहा, ज्या हिशोबाने तू तुझ्या बहिणीचं स्वागत केलं तसेच तुझ्या आयुष्यातही नेहमी आनंद राहो, नेहमी चांगलं काम करत राहा आणि जेव्हाही तुला गरज असेल आम्ही आहोत तुझ्यासोबत…

सलोनी सातपुते – थँक यू मॅम… मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायला आवडेल…

यशोमती ठाकूर – नक्की…. मी जेव्हाही पुण्यातून जाणार असेन, तेव्हा तुला फोन करेन.. मग आपल्याला भेटता येईल

सलोनी सातपुते – हो.. हो.. नक्की..

यशोमती ठाकूर – ओके बेटा, काळजी घे…

सलोनी सातपुते – हो मॅम.. बाय….

सलोनीचा व्हायरल व्हिडीओ

सलोनी सातपुतेने तिची बहिण कोरोनावर मात करुन घरी आल्यानंतर तिच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरुन गाणं लावून डान्स केला. या व्हिडिओमध्ये सलोनी ही ‘टाय टाय फिश…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलोनीवर कौतुकाचा वर्षाव केला (Yashomati Thakur Called Saloni Satpute).

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्तीनंतर पुण्याच्या महापौरांचा पुन्हा धडाका, बेड्सचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना

Published On - 4:17 pm, Wed, 22 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI