आत्ताच निश्चिंत होऊ नका, पुढील वर्षीची परिस्थिती यापेक्षाही खराब असू शकते, नोबेल विजेत्या WFP चा इशारा

World Food Program warns Global leaders about increasing starvation

आत्ताच निश्चिंत होऊ नका, पुढील वर्षीची परिस्थिती यापेक्षाही खराब असू शकते, नोबेल विजेत्या WFP चा इशारा

रोम : वर्ड फूड प्रोग्रामचे (World Food Program- WFP) प्रमुख डेविड बेस्ले (David Beasley) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या संकटात गेलेल्या या वर्षापेक्षा पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक असू शकतं, असा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या या संस्थेला मिळालेल्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने (Nobel Peace Prize) जगातील नेत्यांना सावध करण्याचं सामर्थ्य दिलंय. पुढील वर्ष या वर्षीच्या तुलनेत आणखी खराब असू शकतं. जर अब्जावधी डॉलरची मदत मिळाली नाही, तर ‘2021 मध्ये भूकबळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.’ (World Food Program warns Global leaders about increasing starvation)

डेविड बेस्ले (David Beasley) यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “नोबेल समितीने WFP चं युद्धजन्य भागातील, नैसर्गिक आपत्ती आणि शरणार्थी शिबिरांमधील (Refugee camps) दररोज सुरु असलेलं काम पाहिलंय. संस्थेने लाखों उपाशी लोकांच्या पोटाला अन्न देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला. याशिवाय परिस्थिती आणखी खराब होत आहे आणि आणखी खूप काम करणं बाकी आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून बरंच काम करावं लागणार आहे.”

“WFP ला नोबेल पुरस्कार खूप योग्य वेळेवर मिळाला आहे. असं असलं तरी अमेरिकेच्या निवडणुका (US Election) आणि कोविड-19 साथीरोगाच्या बातम्यांमध्ये संस्थेच्या या पुरस्काराला जितकं महत्व द्यायला हवं होतं तितकं देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आम्ही ज्या प्रश्नाचा अनेक दिवसांपासून सामना करत आहोत त्यावर जगाचं लक्ष गेलं नाही,” असंही बेस्ले यांनी नमूद केलं.

‘जग एकिकडे कोरोनाच्या, तर दुसरीकडे भूकबळीच्या दरीवर उभं’

बेस्ले यांनी यावेळी एप्रिलमध्ये आपल्या सुरक्षा परिषदेत (Security Council) दिलेल्या इशाऱ्याचीही पुनरावृत्ती केली. ते म्हणाले, “एकीकडे जग कोरोना साथीरोगाच्या संकटाचा सामना करत आहे आणि दुसरीकडे जग भूकबळींच्या उंबरठ्यावर उभं आहे. जर यावर तात्काळ उपाययोजना केल्या नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.”

“आम्ही वर्ष 2020 मध्ये भूकबळीचा प्रश्न टाळण्यात यशस्वी झालो. कारण यावर्षी जागतिक स्तरावरील नेत्यांनी (Global Leaders) आर्थिक मदत केली, पॅकेजेस घोषित केले. मात्र, 2020 मध्ये जी मदत मिळाली ती 2021 मध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे WFP सातत्याने या जागतिक नेत्यांशी चर्चा करत आहे. त्यांना येणाऱ्या संकटाची कल्पना देऊन सावथ केलं जात आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Global Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; ‘ग्लोबल हंगर इन्डेक्स’ जाहीर

टुरिस्ट गाईडवर भूकबळीची वेळ, वेरुळ-अजिंठ्यासह राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याच्या मागणीवर अदिती तटकरे म्हणतात…

चीन मंदीच्या उंबरठ्यावर, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शेजारी राष्ट्रांच्या कुरापती

World Food Program warns Global leaders about increasing starvation

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI