AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टुरिस्ट गाईडवर भूकबळीची वेळ, वेरुळ-अजिंठ्यासह राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याच्या मागणीवर अदिती तटकरे म्हणतात…

महाराष्ट्राच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज (15 नोव्हेंबर) राज्यात स्मारकं आणि पर्यटनस्थळं खुली करण्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट केली.

टुरिस्ट गाईडवर भूकबळीची वेळ, वेरुळ-अजिंठ्यासह राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याच्या मागणीवर अदिती तटकरे म्हणतात...
| Updated on: Nov 15, 2020 | 6:56 PM
Share

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज (15 नोव्हेंबर) राज्यात स्मारकं आणि पर्यटनस्थळं खुली करण्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट केली. आतापर्यंत पर्यटनस्थळं खुली करण्याबाबत राज्य सरकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली. याआधी औरंगाबादमध्ये टुरिस्ट गाईड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जगप्रसिद्ध अजिंठा आणि एलोरा गुहांसह इतर पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी खुली करण्याची मागणी केली होती (Aditi Tatkare comment on Opening of Tourist Place in Maharashtra).

सध्या राज्यातील बहुतांश पर्यटनस्थळं कोविड-19 च्या संसर्गामुळे बंद करण्यात आले आहेत. मात्र यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो टुरिस्ट गाईडवर भूकबळीची वेळ आली आहे. यावर अदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “मी याबाबत काहीही सांगू शकणार नाही. कारण पर्यटनस्थळं बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. पर्यटनस्थळं खुली करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.”

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, “मला असे अनेक लोक भेटले ज्यांचा उदरनिर्वाह केवळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील हॉटेल उद्योगाने देखील पर्यटनस्थळं खुली करण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासन याबाबत लवकरच एक प्रस्ताव तयार करेल आणि तो राज्य सरकारकडे पाठवेल.”

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे (एएसआय) औरंगाबाद मंडळाने देखील राज्य सरकारला याबाबत पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून देखील लवकरच हा पत्र व्यवहार राज्य सरकारला केला जाईल.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर खुलं, महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला सशर्त परवानगी

ताडोबापाठोपाठ नवेगाव व्याघ्र पर्यटन 1 नोव्हेंबरपासून सुरु, केवळ 50 टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश

संबंधित व्हिडीओ :

Aditi Tatkare comment on Opening of Tourist Place in Maharashtra

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.