AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nobel Peace Prize | ‘युद्धजन्य भागातही पोटाची भूक शमवली’, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला

जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी 'जागतिक अन्न कार्यक्रम' म्हणजेच 'वर्ल्ड फूड प्रोग्राम' (WFP) ही संस्था ठरली आहे (World Food Programme got 2020 Nobel Peace Prize).

Nobel Peace Prize | 'युद्धजन्य भागातही पोटाची भूक शमवली', यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला
| Updated on: Oct 09, 2020 | 4:21 PM
Share

स्टॉकहोम : जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ म्हणजेच ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (WFP) ही संस्था ठरली आहे (World Food Programme got 2020 Nobel Peace Prize). “‘डब्ल्यूएफपी’ला जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि युद्ध आणि संघर्षासाठी होत असलेला भुकेचा दुरुपयोग रोखण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे,” अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने दिली.

वर्ल्ड फूड प्रोग्रामने 2019 मध्ये जवळपास 88 देशांमधील 10 कोटी नागरिकांच्या भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आहे. भुकेच्या प्रश्नावर काम करणारी आणि अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देणारी ही जगातील सर्वात मोठी मानवतावादी संस्था आहे. कोरोना विषाणूच्या साथीरोगाने जगभरात भुकेच्या बळींची संख्या वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक अन्न कार्यक्रमाने भूकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न वाढवण्याविषयी चांगली क्षमता दाखवली आहे,” असे गौरवोद्गार नोबेल पुरस्कार समितीने काढले आहेत.

नोबेल पुरस्कार समितीने पुढे म्हटलं आहे, “जागतिक अन्न कार्यक्रमाने अनेक स्तरावर शांततेसाठी अन्न सुरक्षा हे एक माध्यम वापरण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तसेच WFP ने संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांचं युद्धजन्य भागात होणाऱ्या भूकेच्या गैरवापराकडे लक्ष वेधलं. या संस्थेने अल्फ्रेड नोबेल यांना अभिप्रेत राष्ट्रांमधील बंधुत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून मोठं योगदान दिलं आहे. ही संस्था नोबेल पुरस्काराला अभिप्रेत अशी आधुनिक शांततेचं प्रतिक असून त्यामुळे या कामाला प्रोत्साहन मिळालं आहे.”

यावेळी या पुरस्काराच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार समिती जगाचं लक्ष भुकेच्या धोक्याचा सामना करत असलेल्या कोट्यावधी नागरिकांकडे वेधू इच्छिते, असंही समितीने नमूद केलं आहे.

या पुरस्कारानंतर नोबेल पुरस्कार्थी वर्ल्ड फूड प्रोग्रामने नोबेल पुरस्कार समितीचे आभार मानले आहे. WFP ने म्हटलं आहे, “या पुरस्कारासाठी आम्ही नोबेल पुरस्कार समितीचे आभारी आहोत. शांतता आणि भूक शमवणे या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात याची आठवण करुन देण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाची बाब आहे.”

नोबेल पुरस्कार का देण्यात येतो?

नोबेल पुरस्कार स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येतात. अल्फ्रेड यांनी मृत्यूआधी आपल्या संपत्तीतील मोठा वाटा नोबेल ट्रस्टला दिला. त्याच पैशातून मानवी हितासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार द्यावा असा त्यांचा उद्देश होता. पहिला नोबेल शांतता पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता. नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांततेच्या क्षेत्रासाठी देण्यात येतो.

पुरस्काराचं स्वरुप एक मेडल आणि 1 कोटी स्वीडिश क्रोना म्हणजेच जवळपास 8 कोटी रुपये मिळणार आहेत.

संबंधित बातम्या :

Nobel Prize | यंदाचा नोबेल पुरस्कार ‘हेपेटायटिस-सी’ विषाणूचा शोध लावणाऱ्या 3 संशोधकांना

Nobel Prize in Physics| रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

Nobel Prize in Physics | 1901 पासून आतापर्यंत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या 4 महिला संशोधक

World Food Programme got 2020 Nobel Peace Prize for fighting with hunger

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.