जॉन सीनाने शेअर केलेल्या फोटोला शिल्पा शेट्टीचं उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा एक मीम्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे मीम्स कोणत्याही सोशल मीडियावर युजर्सने नाही तर WWE स्टार जॉन सीनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे

जॉन सीनाने शेअर केलेल्या फोटोला शिल्पा शेट्टीचं उत्तर
Namrata Patil

|

Jul 13, 2019 | 4:29 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा एक मीम्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे मीम्स कोणत्याही सोशल मीडियावर युजर्सने नाही तर WWE स्टार जॉन सीनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. जॉन सीनाने शेअर केलेल्या या मीम्सवर शिल्पानेही तिच्या स्टाईलमध्ये हटके कमेंट केली आहे.

जॉन सीनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने स्टीव्हन एण्डरसनचा फोटो मॉर्फेड केला असून त्यावर शिल्पा शेट्टीचा चेहरा लावला आहे. विशेष म्हणजे या फोटोला ‘स्टोन कोल्ड शिल्पा शेट्टी कुंद्रा’ असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान जॉन सीनाने शेअर केलेल्या या फोटोत शिल्पा शेट्टीला लगेचच ओळखता येतं आहे.

View this post on Instagram

A post shared by John Cena (@johncena) on

जॉनने शेअर केलेले मीम्स शिल्पानेही स्वत:च्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यावर तिने शिल्पाने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. हा फोटो शेअर करताना कूल, हे खूप मजेदार आहे असे लिहिले आहे. तसेच This is hilarious… I certainly “Didn’t SEE” this coming, @johncena असेही कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला असून अभिनेता मनीष पॉलनेदेखील या फोटोवर त्याचं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान या मीम्सपूर्वी जॉनने शिल्पा शेट्टी आणि तिचा मुलगा वियान राज कुंद्रा याला एक खास मेसेज दिला होता. वियान जॉन सीनाचा मोठा चाहता असून एका कार्यक्रमामध्ये त्याने जॉन सीनाविषयी त्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर जॉन सीनाने वियानला एक खास मेसेज दिला होता. शिल्पाने सोनी टीव्हीवरील सुपर डान्सर चॅप्टर 3 मध्ये परीक्षक म्हणून काम करत होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें