अती बर्फवृष्टीमुळे यवतमाळचे 10 पर्यटक जम्मूमध्ये अडकले

यवतमाळ : यवतमाळ येथील जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाचे 10  सदस्य वैष्णोदेवी दर्शनासाठी गेले होते. मात्र जम्मूमध्ये होणाऱ्या अती वृष्टीमुळे ते पटणीटॉप येथे 20 जानेवारीपासून अडकले आहेत. जवान त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करत असून लवकरच त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. यवतमाळ येथील जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाचे दहा सदस्य 17 जानेवारीला नागपूरहून वैष्णोदेवी करता निघाले होते. 19 जानेवारीला त्यांनी […]

अती बर्फवृष्टीमुळे यवतमाळचे 10 पर्यटक जम्मूमध्ये अडकले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

यवतमाळ : यवतमाळ येथील जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाचे 10  सदस्य वैष्णोदेवी दर्शनासाठी गेले होते. मात्र जम्मूमध्ये होणाऱ्या अती वृष्टीमुळे ते पटणीटॉप येथे 20 जानेवारीपासून अडकले आहेत. जवान त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करत असून लवकरच त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे.

यवतमाळ येथील जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाचे दहा सदस्य 17 जानेवारीला नागपूरहून वैष्णोदेवी करता निघाले होते. 19 जानेवारीला त्यांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. 20 जानेवारीला कटरा येथून 70 किलोमीटर दूर असलेल्या पटणीटॉप या बर्फाच्छादीत भागात ते पर्यटनासाठी गेले. मात्र, या भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु झाल्याने मागील 120 तासापासून म्हणजेच पाच दिवसांपासून या भागात अडकलेले आहेत.

या भागात महाराष्ट्रातील जवळपास 100 हून जास्त पर्यटक अती बर्फवृष्टीमुळे अडकले आहेत. स्वत: या ठिकाणी अडकलेले असतानाही जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाच्या दहा सदस्यांनी या भागात अडकलेल्या जवळपास 300 पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली. त्यासाठी त्यांनी दीड ते दोन किलोमीटरचा बर्फाच्छादीत रस्ता तयार करत 300 पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.

पवन अराठे, विकास शेटे, मनीष देशपांडे, प्रशांत शेटे, शेखर एनगंतीवर, शुभम गिरमकर, सागर सुर्यवंशी, रितेश निलावर, रवी ठाकूर अशी अडकलेल्या पर्यटकांची नावे आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.